शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

पुन्हा लाॅकडाऊन नको रे बाबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST

महानगरात आतापर्यंत १५६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा लाॅकडाऊन लागू शकतो, अशी चर्चा ...

महानगरात आतापर्यंत १५६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा लाॅकडाऊन लागू शकतो, अशी चर्चा काही दिवसांपासून नागरिकांमध्ये सुरू आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांसाठी लाॅकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होतो. अचानक व पहिल्यांदा लाॅकडाऊन जाहीर झाल्याने उद्योग, व्यापार व लहानमोठे व्यवसाय ठप्प झाले होते. दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने पुन्हा व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र अद्यापही व्यवसाय पूर्वपदावर येऊ शकला नाही. पुन्हा लाॅकडाऊनचा निर्णय घेतल्यास आर्थिक अडचणी निर्माण होतीलच. मात्र परराज्यातून जिल्ह्यात आलेले व लहान व्यवसायावर उपजीविका भागविणाऱ्या व्यावसायिकांवर संकट येणार आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात कोरोनावर लस किंवा औषधी नसल्याने प्रशासनाला अडचणी आल्या होत्या. मात्र सध्या सर्व काही असताना लाॅकडाऊन करणे उचित नाही. प्रशासनाने महानगरातील सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

या व्यावसायिकांना असेल निर्बंध

३० मार्च रोजीच्या मध्यरात्रीपासून लागू असणाऱ्या प्रतिबंध आदेशाने सायंकाळी ८ वाजेपासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, मॉल्स, सभागृहे आणि रेस्टॉरंट‌्स बंद राहतील. मात्र, या कालावधीत रेस्टॉरंटमधून होम डिलिव्हरी व पार्सल सुविधा देण्यास परवानगी असेल, तर सिनेमा, हॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास किंवा या आदेशातील अटी-शर्तींचा भंग केल्यास कारवाई केली जाणार आहे.

मंगल कार्यालयासह अन्य व्यावसायिक पुन्हा अडचणीत

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात शासनाने सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे लग्नासाठी ५० नागरिकांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे मंगल कार्यालय, हाॅल व आचारी, मंडप, डीजे तसेच अन्य लग्नकार्यावर अवलंबून असलेल्या लहानमोठे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. पुन्हा प्रशासनाने लाॅकडाऊन जाहीर केल्यास अनेकांवर उपासमारीचे संकट येणार आहे.

अन्य लहान व्यावसायिकांना पडली चिंता

नव्याने लाॅकडाऊन जाहीर केल्यास किराणा, सलून, भाजी विक्रते, फेरीवाले, हातगाडीवाले रस्त्यावर बसणारे कटलरी, स्टोव्ह, गॅस, मिक्सर, चेन दुरुस्त करणारे. पंक्चर काढणारे, शिंपी, सराफी दुकानातील कारागीर, ट्रक, दुकानांच्या शटरला ग्रिसिंग करणारे गटाई कामगार, घड्याळ दुरुस्ती, चष्मा दुरुस्ती, डुप्लिकेट चावी तयार करणारे, गॅरेज, सायकल दुरुस्ती असे लहान व्यावसायिकांना पहिल्या टप्प्यातील लाॅकडाऊनमध्ये उपासमारीला सामोरे जावे लागले होते. पुन्हा लाॅकडाऊन जाहीर झाल्याने कोरोनामुळे कमी तर उपासमारीमुळे मरण्याची वेळ येऊन ठेपणार असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले.