शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

‘कोरोना व्हायरस’ ची भिती मनात बाळगू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:46 IST

धुळे : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला असून अनेकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे़ याच भितीपोटी कोरोनाची लागन होऊ ...

धुळे : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला असून अनेकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे़ याच भितीपोटी कोरोनाची लागन होऊ नये, यासाठी अनेक जण घराबाहेर निघतांना मास्क लावून फिरत असल्याचे स्पष्ट झाले़ परंतू याची भिती मनात बाळगू नका, यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती मनपा आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मराठी व उर्दू भाषेतील बॅनर शहरात लावण्यात येत आहे.कोरोना व्हायरस कशाद्वारे होत आहे़ याबाबत नेमकी माहीती आजही प्राप्त झालेली नाही़ मात्र हवेतील ससंर्गजण्य विषाणूद्वारे या आजाराची लागण होते़ आजाराचे रूग्ण जरी नसले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी पण भीती बाळगू नये, असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे़ नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी, यासाठी शहरात मुख्य ३० ते ४० ठिकाणी मराठी व उर्र्दु भाषेतील बॅनरद्वारे जनजागृती केली जाणार आहे़मनपाकडून उपाय-योजनावर भरकोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असली तरी सावधनता बाळगण्यासाठी मनपा आरोग्य विभागाला सज्ज राहण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहे़ आजाराचे लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय योजना, मनपाच्या दवाखान्यात येणाऱ्या सर्दी खोकला, किंवा संशयित रूग्णांना हिरे वैद्यकीय रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली आहे़ नागरिकांसोबतच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संरक्षणाची साधने उदा़ मास्क, हॅन्ड ग्लोज वापरण्याच्या सुचना केल्या आहेत.व्यावसायिकांना फटकाकोरोना विषाणूचा फैलाव चिकनमधून होत असल्याच्या भितीने पोल्ट्री व्यवसायावर मंदीचे सावट पसरले आहे़सार्वजनिक ठिकाणी दक्षताशहरातील बस स्थानक, बॅका, चित्रपटगृह, रेल्वेस्टेशन, मार्केट अशा सार्वजनिक ठिकाण तसेच दुचाकीवरून प्रवास करणाºया नागरिकानी मास्क व तोंडाला रूमाल लावतांना दिसून येत आहे़४१ आरोग्य केंद्र सज्जचारही तालुक्यात ४१ आरोग्य केंद्रात सुमारे १४०० कर्मचारी कार्यरत आहे़ अधिकारी व कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे