शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

डॉक्टरांचा एल्गार; आरोग्यसेवा ठप्प

By admin | Updated: March 15, 2017 23:51 IST

मारहाण प्रकरण : तरुणावर अंत्यसंस्कार, ‘आयएमए’चा मूक मोर्चा, वडार समाजाचे निवेदन

धुळे : शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीतील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या करणा:या तरुणाचे बुधवारी सकाळी ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात आल़े या घटनेचा ‘सीआयडी’ने तपास सुरू केला आह़े तर दुसरीकडे आयएमए संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आल़े वडार समाजानेदेखील प्रशासनाला निवेदन दिल़े‘आयएमए’तर्फे मूक मोर्चा!हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिरोग विभागात कार्यरत असलेल्या डॉ़ रोहन म्हामुनकर यांना 25 ते 30 जणांच्या जमावाने बेदम मारहाण केली़ या घटनेचा निषेध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला़ मोर्चाला दुपारी साडेबारा वाजता मनोहर टॉकीजजवळील शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरुवात झाली़ मोर्चात सहभागी विद्याथ्र्यानी विविध फलक झळकावल़े मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाल्यानंतर वैद्यकीय अधिका:यांचे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी गेल़े उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना निवेदन देत विविध मागण्या करण्यात आल्या़ अशा होत्या मागण्या़़़डॉक्टरांवरील हल्ले टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, ज्यामुळे शासकीय महाविद्यालयातील वैद्यकीय व नर्सिग, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचा:यांना चांगली सेवा प्रदान करता येऊ शकेल, सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचा:यांवर झालेली कारवाई रद्द करण्यात यावी, उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करावी व तपास वरिष्ठ अधिका:याने करावा आदी मागण्या आयएमएतर्फे  करण्यात आल्या़ शिवसेनेचे महेश मिस्तरी यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ सतीशकुमार गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली़ मोर्चात घेतला सहभागआयएमएचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ़ रवी वानखेडकर, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ़विनोद शहा (सुरत), महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ़ अशोक तांबे (बारामती), सचिव डॉ़ पार्थिव संघवी (मुंबई), डॉ़ मंगेश पाटे (डोंबिवली), एमसीआयचे कार्यकारिणी सदस्य डॉ़ निसार शेख (अहमदनगर), डॉ़ भूपेश चावडा, डॉ़ गिरीश मोदी, डॉ़दीपक बैद, डॉ़नीलिमा वैद्य, आयएमएच्या धुळे जिल्हाध्यक्षा डॉ़ विजया माळी, डॉ़ सविता नाईक, डॉ़ पंकज देवरे, डॉ़ संदीप बियाणी यांच्यासह डॉक्टर्स, वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होत़े त्यात शिवसेनेच्या डॉ़ माधुरी बाफना, महेश मिस्तरी, राष्ट्रवादीचे संदीप बेडसे, संजय वाल्हे, भाजपचे हिरामण गवळी, मनसेचे अविनाश मोरे यांचा समावेश होता़वडार समाजाचेही निवेदनवडार समाजानेही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला बुधवारी निवेदन दिल़े  आपल्या समाजाचे चैत्राम उर्फ शत्रू लष्कर व प्रदीप वेताळ यांच्या मोटारसायकलला अपघात झाल्याने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल़े त्या वेळी डॉक्टरांकडे तत्काळ उपचारांची मागणी केली असता डॉ़ रोहन म्हामुणकर हे दारूच्या नशेत आले व त्यांनी औषधोपचार न करता रुग्णांच्या नातेवाइकांना शिवीगाळ करून सीटी स्कॅन करण्यासाठी खासगी रुग्णालयात नेण्यास सांगितल़े  त्यामुळे समाज बांधवांना राग आला व त्यांनी डॉक्टरला मारहाण केली़  जर डॉक्टरने शिवीगाळ न करता वेळीच उपचार केले असते तर असा प्रसंग उद्भवला नसता़ या घटनेनंतर डॉक्टरांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला व संशयितांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आल़े मात्र डॉक्टरांनी विनाकारण गुन्हा दाखल केल्याने आपल्याला नोकरी मिळणार नाही, तसेच आपल्या मित्राला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला़  या विवंचनेतून प्रदीप वेताळ याने गळफास लावून आत्महत्या केली़  त्यामुळे या घटनेला जबाबदार संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वडार महासंघातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली़ या वेळी व्ही़एस़गुंजाळ, लक्ष्मण विटेकर, दीपक वेताळ, नामदेव कुसळकर, ईश्वर वेताळ, लखन चौगुले, किशोर लष्कर, कालीदार कुसळकर, संजय लष्कर, ज्ञानेश्वर गुंजाळ, शंकर कु:हाडे, राजू कुसळकर उपस्थित होत़े विविध संघटनांची निवेदऩे़सदर घटनेचा भारिप बहुजन महासंघातर्फे निषेध नोंदविण्यात आला़ तसेच डॉक्टरांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली़ या वेळी जिल्हाध्यक्ष भैया पारेराव, मिलिंद वाघ, रज्जाक सैयद, योगेश बेडसे, नीलेश अहिरे उपस्थित होत़े अखिल भारतीय युवक काँग्रेसनेही या घटनेचा निषेध केला व 200 खाटांचे प्रस्तावित रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली़ लोक जनशक्ती पार्टीनेही प्रशासनाला निवेदन सादर केल़ेइनकॅमेरा शवविच्छेदऩ़़4बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत प्रदीप वेताळ या तरुणाच्या मृतदेहाचे ‘इन कॅमेरा’ विच्छेदन करण्यात आल़े नमुनेही राखून ठेवण्यात आले आहेत़ या वेळी डॉ़अजित पाठक, के.एल़ चौधरी, एऩडी़ देवराज, आऱक़े गढरी, राजश्री दामले हे उपस्थित होत़े सकाळी दहा वाजेच्या सुमारास शवविच्छेदनास सुरुवात झाली़4विच्छेदनानंतर प्रदीप वेताळ याचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला़ त्याच्यावर चक्करबर्डी येथे अत्यसंस्कार करण्यात आल़े या वेळी नातेवाइकांसह ग्रामस्थ उपस्थित होत़े तसेच पोलीस कर्मचारीही हजर होत़ेसीआयडीकडून कागदपत्रांची तपासणी 4घटनेचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला असून सीआयडीने मंगळवारपासूनच तपास सुरू केला़ बुधवारी सकाळी नाशिक सीआयडीचे पोलीस अधीक्षक रमेश गायकवाड, धुळ्याचे पोलीस उपअधीक्षक गणेश चौधरी,  हे.कॉ. नरेंद्र कुलकर्णी, मनोहर जाधव, उमेश येवले यांनी घटनास्थळासह पोलीस कोठडी, लॉकअप रजिस्टर, रेकॉर्डची तपासणी केली़ 4सीआयडीच्या पथकाने शहर पोलीस ठाण्यातील संबंधित रजिस्टर, रेकॉर्ड बुक जप्त केले आह़े तसेच संशयित अंबादास कुसळकर, सुनील कुसळकर आणि छोटू विठेकर यांचे जाबजबाब नोंदविण्यात आले. तर घटनेच्या दिवशी व वेळी हजर संबंधित पोलीस कर्मचा:यांचे जबाब नोंदविणे सुरू आहे.बंदोबस्तातील पोलिसही तणावात 4डॉक्टर मारहाणप्रकरणी अटकेत असलेले विनोद बापू तागळकर (22), चंद्रकांत किसन लष्कर (32), अजय विजय लष्कर (19), एकनाथ शंकर कुसळकर (23), लखन सीताराम लष्कर (23), अंबादास मनोहर कुसळकर (28), सुनील रामकिसन कुसळकर (30), छोटू बापू विठेकर (26) यांना बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली़ 4प्रदीप वेताळ या तरुणाने पोलीस कोठडीतील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे शहर पोलीस ठाण्याच्या अधिका:यांसह त्या दिवशी पोलीस कोठडीच्या बंदोबस्ताला असलेल्या कर्मचा:यांचे टेन्शन चांगलेच वाढल्याचे बुधवारी दिसून आल़े