शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:27 IST

दोंडाईचा : धनगर समाज संघर्ष समितीची मागणी, तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : धनगर समाजाला आरक्षण  मिळेपर्यंत महाराष्ट्रात  मेगा भरती थांबविण्यात यावी, अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीने केली आहे. याबाबत दोंडाईचा तहसिल कार्यालयात मंडळ अधिकारी आर.टी. मोरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.दोंडाईचा येथील  धनगर समाज संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्टÑात मराठा समाजाला आरक्षण दिले  आहे. त्याचप्रमाणे धनगर समाजाला पण तात्काळ  आरक्षण द्यावे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या पार्श्वभूमीवर  शासनाने मराठा समाजासाठी शासकीय नोकर मेगाभरती थांबवली होती. आता  मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर मेगाभरतीस सुरुवात केली जात आहे. धनगर समाजाला आरक्षण  देन्यासंदर्भात   मुख्यमंत्र्यांनी  संकेत दिले आहेत. म्हणून धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मेगाभरती करू नये, भरती झाल्यास धनगर समाजातील तरुण  भरतीपासून वंचित राहणार आहेत, तरुणांचे  मोठे नुकसान होणार आहे. मेगाभरती झाल्यानंतर नवीन भरती लवकर होत नसल्याने   आरक्षणाचा फायदा धनगर समाजातील तरूणांना होणार नाही. त्यामुळे  शासनाने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मेगाभरती करू नये, अशा  मागणीचे निवेदन धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष  सुनिल धनगर, दोंडाईचा शहराध्यक्ष संजय लांडगे, जयवंत बोरसे, पप्पू धनगर, वाल्मिकी धनगर, नरेंद्र बाविस्कर, शैलेश बोरसे, टायगर धनगर, वकील धनगर, सदाशिव भलकार, कृष्णा धनगर, अविनाश धनगर, दिपक काकडे   आदींनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे