शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

देवपुरात चोरट्यांची दिवाळी रोकडसह साड्या लांबविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 12:10 IST

नकाणे रोडवरील केले नगरातील घटना : ३५ हजारांचा होता ऐवज

धुळे : देवपुरातील नकाणे रोडला लागून असलेल्या केले नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३५ हजाराचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे़ शुक्रवारी दुपारी याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ पशुसंवर्धन विभागाचे निवृत्त किशोर जगन्नाथ वडनेरे (६६) यांचे नकाणे रोडवर केले नगरात घर आहे़ १३ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता घराला कुलूप लावून वडनेरे कुटूंबिय गावी गेले होते़ ही संधी साधत चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करीत कपाटात सुरक्षित ठेवलेले १५ हजाराची रोकड, लग्नाचा शालू तसेच महागाड्या साड्या असा एकूण ३५ हजाराचा ऐवज चोरट्याने शिताफिने लांबविल्या़ वडनेरे कुटूंबिय घरी परत आल्यानंतर तुटलेले कुलूप आणि घरात अस्ताव्यस्त पडलेले साहित्य लक्षात घेता, घरात चोरी झाल्याचे समोर आले़ त्यांनी तातडीने पश्चिम देवपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली़ पोलीस निरीक्षक कुबेर चवरे आणि पथकाने घटनास्थळी येवून पाहणी केली़ परंतु चोरट्यांना चोरी झाल्याचा ठोस पुरावा हाती लागलेला नाही़ याप्रकरणी किशोर वडनेरे यांच्या तक्रारीवरुन पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला़ दरम्यान, अगदी याच पध्दतीने देवपुरातील मंगलमुर्ती कॉलनीत घरफोडी झाली होती़ घरमालक जोशी हे बाहेरगावी गेले होते़ तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या घरात चोरी केली होती़ काही महिन्यांपुर्वीची ही घटना आहे़ दिवाळी सण असल्याने बहुतेक जणं गावाला जात असल्याने घर बंद दिसत आहे़ ही संधी साधून चोरटे हातसफाई करीत असल्याने त्यांचीही दिवाळी साजरी होत असल्याचे घटनांवरुन समोर येत आहे़  

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी