जिल्हा समन्वयक डॉ. नरेंद्र भदाणे, कृषिभूषण प्रकाश पाटील यांच्या सहकार्याने ही निवड प्रक्रिया राबविली. नवनियुक्त तालुका समन्वयक सरपंचाची बैठक धुळे कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात झाली.
एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाशराव महाले,नाशिक विभाग समन्वयक संजय भांबर व धुळे जिल्हा समन्वयक. डॉ. नरेंद्र भदाणे यांनी नवनियुक्त तालुका समन्वयक सरपंचांशी संवाद साधला.
'एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट'चे प्रमुख राहुल कराड यांची विचारभूमिका विशद करून विविध उपक्रमांविषयी योगेश पाटील यांनी माहिती दिली.
तालुकानिहाय समन्वयक असे-धुळे तालुका युवराज राऊत ,शिंदखेडा तालुका छगनराव खंडारे, शिरपूर तालुका प्रा. संजय पाटील, साक्री तालुका-
चित्रा प्रदीप नांद्रे ,सुमित्रा हडक्याजी राऊत
'एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसदेच्या अराजकीय ग्रामविकास कार्यात हिरीरीने सहभागी होण्याचा मनोदय कृषिभूषण प्रकाशपाटील यांनी व्यक्त केला.