शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या शतकाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 22:03 IST

महाविद्यालयातील ८९ तर जिल्हा रूग्णालयातील ८ रूग्ण कोरोनामुक्त

धुळे : जिल्ह्यातील कोरोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या रूग्णांची संख्या लक्षणीय आहे. उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन रूग्ण घरी परतत आहेत. कोरोनामुक्त रूग्णांच्या शतकाकडे वाटचाल सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यातील ९७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रूग्णालयात कोरोना बाधीतांवर उपचार सुरू आहेत. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणाºया ८९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर जिल्हा रूग्णालयात उपचार घेतलेले ८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.धुळे शहरातील ७५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच शिंदखेडा तालुक्यातील सात, साक्री तालुक्यातील सात, शिरपूर तालुक्यातील सहा तर धुळे तालुक्यातील दोन रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या शतकाकडे सुरू असलेली वाटचाल वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची पावती आहे. योग्य वेळी उपचार घेतले तर कोरोनावर सहज मात करणे शक्य असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. लक्षणे आढळली अथवा बाधीत रूग्णाच्या संपर्कात आलात तर तात्काळ तपासणी करायला हवी.कर्मचाºयांच्या मेहनतीची पावतीजिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या शतकाकडे सुरू असलेली वाटचाल वैद्यकीय कर्मचाºयांच्या मेहनतीची पावती आहे. योग्य वेळी उपचार घेतले तर कोरोनावर सहज मात करणे शक्य असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. लक्षणे आढळली अथवा बाधीत रूग्णाच्या संपर्कात आलात तर तात्काळ तपासणी करायला हवी, असे शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अति विशेष अधिकारी डॉ.दिपक शेजवळ यांनी सांगितले.प्रशासकीय समन्वय महत्वाचेआरोग्य विभाग व प्रशासकीय यंत्रणा यांच्या समन्वयामुळे कोरोनामुक्त रूग्णांच्या शतकाकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. विविध प्रशासकीय यंत्रणांच्या समन्वयामुळे संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त होईल असा विश्वास वाटतो, असे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ.विशाल पाटील यांनी सांगितले.२२ परप्रांतीय झाले कोरोनामुक्तयेथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतलेले २२ परप्रांतीय बाधीत रूग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. धुळ्यानजीक वेगवेगळ्या अपघातात जखमी झाल्यानंतर उपचारासाठी त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्यांमध्ये मालाड, भांडूप, दादर व उत्तर प्रदेशातील व्यक्तींचा समावेश आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयातून एकूण १०९ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत त्यामध्ये जिल्ह्यातील ९७ तर जिल्ह्याबाहेरील २२ रूग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :Dhuleधुळे