धुळे : जिल्हा काँगे्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे खंदे कार्यकर्ते, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मधुकर गर्दे (वय ६४) यांचे निधन झाले़नाशिक येथे दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते़ अखेर बुधवारी सकाळी ५ वाजता त्यांची प्राणज्योती मालवली़ त्यांच्यावर सडगाव येथील मुळगावी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मधुकर गर्दे हे १९७६ पासून माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यासोबत राजकारणात सक्रिय होते़ सरपंच पदापासून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदापर्यत त्यांनी विविध पदे यशस्वीपणे सांभाळली होती़ त्यानंतर गर्र्दे यांनी १९८७ ते १९९० या काळात पंचायत समितीचे सभापती, धुळे तालुका दुध संघाचे चेअरमन, कृ ऊबा समितीचे सभापती तसेच श्री साईबाबा शिर्डी संस्थानचे ट्रस्टी अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळली होती़ दांडगा जनसंपर्क, वक्तृत्व आणि नेतृत्व अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते मधुकर गर्दे यांच्या निधनाने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे़
जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते मधुकर गर्दे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:56 IST