लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : येथील सामाजिक बांधिलकी जोपासण्यात नेहमी अग्रेसर असणाºया येथील श्री विठ्ठल रुखमाई पतसंस्थेमार्फत प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबविले जातात. ह्या वर्षी देखील येथील ग्रामपंचायत कार्यालया च्या मागच्या बाजूने असलेल्या जिल्हा परिषद शाळा क्र.तीनमधील गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेपाट्या, पेन, वह्या तसेच दप्तर सारख्या शैक्षणिक साहित्याचा समावेश करून विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. यासोबत पर्यावरण संतुलनासाठी परिसरात विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे संचालक नंदू चौधरी, माजी सरपंच वाल्मीक वाणी, पराग देशमुख, रमेश कासार, संदीप गुजर, आरिफखॉ पठाण, शरद चौक, राधेश्याम वाणी, पतसंस्थेचे व्यवस्थापक श्रीकांत देशपांडे, शिक्षण विस्तार अधिकारी भामरे, मुख्याध्यापिका साळुंके देशपांडे, शिंदे यांच्यासह पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 17:17 IST