धुळे : खाते, बियाणे व सिंचन सुविधांसाठी शेतकऱ्यांना माध्यम मुदतीचे पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जिल्हा अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी त्याबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. खाते खरेदी करण्यासाठी तसेच सिंचनाच्या सुविधेसाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज आहे. मध्यम मुदतीचे पीक कर्ज उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे.
सत्ताधारी पक्ष पीक कर्ज उपलब्ध करण्याबाबत फक्त घोषणा करतात. मात्र बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना जुमानत नाहीत. शासनाने पीक कर्जासाठी विशेष लक्ष्यांकाची घोषणा केली आहे. पण लक्ष्यांक कोणत्याच वर्षी सध्य होत नाही. त्याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर आप जिल्हा मीडिया प्रमुख पीयूष शिंदे, अनिल पवार, महारू पाटील, चुनीलाल माळी, शरद पाटील, भिकन पवार, पराग धनगर आदींची नावे आहेत.