शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा परिषद बरखास्त करुन प्रशासक नेमावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:07 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे जिल्हा दौऱ्यावर

धुळे - धुळेजिल्हा परिषदेची मुदत ३१ डिसेंबरला समाप्त होत आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने निवडणूक होऊ शकत नाही. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत जिल्हा परिषद बरखास्त करुन प्रशासक नेमण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता जि.प. बरखास्त करुन प्रशासक नेमण्यात यावे अशा मागणीचे निवेदन गोंदूर विमानतळावर भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी भाजपा शेतकरी आघाडी उपाध्यक्ष बापु खलाणे, माजी जि.प. अध्यक्ष मनोहर भदाणे यांचा समवेत दिले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, धुळे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ डिसेंबर २०१८ मध्ये पूर्ण झालेला असून जिल्हा परिषदेची निवडणुक लांबणीवर पडलेल्याने निवडणुका होईपावतो जिल्हा परिषद बरखास्त करुन याठिकाणी प्रशासकाची नेमणुक करावी. तसेच प्रशासक नेमणुक करुन ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मदत होईल.या जिल्हा परिषद सदस्यांचा पाच वर्षाचा कालावधी पुर्ण झालेला असुन जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेला नाही. त्यामुळे ही जिल्हा परिषद बरखास्त करुन प्रशासक नेमण्यात यावे अशी मागणी जिल्हाच्यावतीने भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्यासह भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस किशोर सिंघवी, जिल्हा सरचिटणीस वसंतराव बच्छाव, कामराज निकम, अरुण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष जिजाबराव सोनवणे, धिरेंद्र सिसोदिया, सरलाबाई बोरसे, चंद्रजित पाटील, किशोर माळी, भाऊसाहेब देसले, प्रदिप कोठावदे, प्रा.अरविंद जाधव, देवेंद्र पाटील, मिलिंद पाटील, जिल्हा चिटणीस दरबारसिंग गिरासे, वैशाली महाजन, लिलाबाई सुर्यवंशी, सविता पगारे, शितल ठाकुर, चंद्रकांत पाटील, संजय आसापुरे, आशाबाई पाटील, सुशिलाबाई जमादार, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मोतीलाल पोतदार, जिल्हा कार्यालय प्रमुख रत्नाकर बैसाणे,साक्री तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, शिंदखेडा तालुकाध्यक्ष नथ्थु पाटील, धुळे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.राहुल पाटील, शिरपुर तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शिरपुर शहराध्यक्ष हेमंत पाटील, दोंडाईचा शहराध्यक्ष प्रविण महाजन, शिंदखेडा शहराध्यक्ष दिनेश सुर्यवंशी, पिंपळनेर शहराध्यक्ष प्रमोद गांगुर्डे, साक्री शहराध्यक्ष महेंद्र देसले आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदDhuleधुळे