धुळे : दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या विविध योजनांचा अनुदानाचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून लाल फितीच्या कारभारात अडकलाय़दरम्यान, प्रहार अपंग क्रांती संस्थेतर्फे जिल्हाध्यक्ष शशिकांत चंदन सुर्यवंशी, सह खजिनदार व शहर प्रमुख अॅड़ कविता एस़ पवार, अरुण चतुर पाटील, तुषार भागवत पाटील यांच्या शिष्टमंडळाने दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित माण्यांचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले़दिव्यांग व्यक्ती समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग अधिनियम १९९५ व कायदा २०१६ प्रमाणे शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे़निवेदनात म्हटले आहे की, विविध योजनांच्या अनुदानासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्यासह पालकमंत्र्यांशी चर्चा करुन देखील आजपावेतो प्रश्न सुटलेला नाही़ या कालावधीत वेळोवेळी निदर्शने करुन निवेदन देण्यात आले आहे़ आॅक्टोबर २०१८ पासून ४० ते ७९ टक्के नुसार आठशे रुपये व ८० टक्केच्या पुढे दिव्यांगांना एक हजार रुपये वाढीव निधीचा फरक अद्याप मिळालेला नाही़तसेच सुधारीत शासन निर्णयाप्रमाणे सरसकट सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना एक हजार रुपये संजय गांधी निराधार योजनेतून अनुदान देण्याचे आदेश आहेत़ एक अपत्य असलेल्या दिव्यांगांना अकराशे रुपये तर दोन अपत्य असलेल्यांना बाराशे रुपये वाढील अनुदान दिलेले नाही़काही बहुविकलांग वंचित दिव्यांग परिस्थितीनुसार संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकले नाहीत़ त्यांचे हयातीचे दाखले तसेच इतर आवश्यक कागदपत्रे तलाठी, ग्रामसेवकांमार्फत संकलीत करावे अशी मागणी करण्यात आली आहे़
दिव्यांगांचे अनुदान अडकले लाला फितीच्या कारभारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 20:41 IST