आॅनलाइन लोकमतधुळे :परराज्यातील संस्कृती, तेथील ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची गुजरात राज्यात अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथमच अभ्यास दौºयासाठी विद्यार्थ्यांना परराज्यात नेण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू, स्थळे याची माहिती व्हावी म्हणून जिल्हा परिषदेतर्फे प्राथमिक विद्यार्थ्यांचा जिल्हांतर्गत अभ्यास दौरा आयोजित करीत असते. मात्र यावेळी प्रथमच राष्टÑीय अविष्कार अभियानांतर्गत परराज्यात अभ्यास दौºयाचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्टÑ शिक्षण परिषद समग्र शिक्षा अभियानामार्फत याचे नियोजन केले जात आहे.या अभ्यास दौºयामध्ये जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावी ते आठवीचे १०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यांच्या समवेत दहा शिक्षण असतील. तीन दिवसांचा हा अभ्यास दौरा असून, त्यासाठी दोन खाजगी बसेस आरक्षित करण्यात आलेल्या आहेत.या दौऱ्यांतर्गत विद्यार्थी गुजरातमधील आदर्श शाळा, त्याचबरोबर स्टॅच्यु आॅफ युनिटी, पावागड, गांधीनगरातील कांकरिया गार्डन याच्यासह या राज्यातील प्रमुख वारसास्थळांना भेटी देणार आहेत. यासाठी तीन लाखाचा निधीही मंजूर झाला आहे.या अभ्यास दौºयाचे नियोजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सांगण्यात आले.
धुळे जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांचा परराज्यात अभ्यास दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:19 IST