शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Dhule: गोळी झाडून धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा खून, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला हल्ला, कारण अस्पष्ट

By देवेंद्र पाठक | Updated: May 26, 2023 19:15 IST

Dhule Crime: धुळे तालुक्यातील पिंपरखेडा ते उभंड दरम्यान असलेल्या बारीत यशवंत सुरेश बागुल ( वय ३८, रा. मिलिंद सोसायटी, साक्री रोड, धुळे ) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचानक हल्ला केला.

- देवेंद्र पाठकधुळे : तालुक्यातील पिंपरखेडा ते उभंड दरम्यान असलेल्या बारीत यशवंत सुरेश बागुल ( वय ३८, रा. मिलिंद सोसायटी, साक्री रोड, धुळे ) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचानक हल्ला केला. त्यातील एकाने कानाच्या जवळ डोक्यात गोळी झाडून तर दुसऱ्याने चाकू सारख्या धारदार हत्याराने सपासप वार केल्याने निर्घृण खून केला. ही थरारक घटना गुरुवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली. ही घटना घडली त्यावेळेस मयत यशवंत बागुल यांचा मामाचा मुलगा पंकज मोहिते हा सोबत होता. या घटनेमुळे तो प्रचंड घाबरला आहे. याप्रकरणी मयत यशवंतची पत्नी आशाबाई यशवंत बागुल यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला.

उभंड शिवारात घेतली शेती धुळ्यातील साक्री रोडवरील मिलिंद सोसायटीत राहणारे यशवंत सुरेश बागुल यांनी धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे येथे शेती घेतली हाेती. ते आठवड्यातून दोन ते चार दिवस तिकडेच मुक्कामी राहून शेती सांभाळत होते. गुरुवारी सायंकाळी ते शेतमजूर शोधण्यासाठी त्यांचा मामेभाऊ पंकज राजेंद्र मोहिते यांच्यासोबत पिंपरखेडा येथे गेलेले हाेते. तेथून परतत असताना पिंपरखेडा ते उभंड दरम्यान असलेल्या बारीत त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडविले. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. लागलीच त्यांच्यावर हल्ला केला.

घटनास्थळावरून मॅग्झिन हस्तगतदोघांपैकी एकाने बंदुकीतून गोळी झाडल्याने ती त्यांच्या कानाच्या जवळ बसली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. तर दुसऱ्याने चाकू सारख्या धारदार हत्याराने मानेजवळ, पोटात वार केल्याने यशवंत हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. वार जोरात बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेजारीच त्यांच्यावर झाडण्यात आलेल्या गावठी कट्ट्याच्या गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या आणि मॅग्झिन मिळून आले. धुळे तालुका पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे आणि पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावरील परिस्थितीजन्य काही पुरावे गोळा केलेले आहे. याशिवाय पोलिसांच्या फाॅरेन्सिक, ठसे तज्ज्ञ पथकाने सुद्धा नमुने गोळा केलेले आहे. श्वान पथकानेही माग दाखवून पोलिसांच्या तपासात गती देण्याचा प्रयत्न केला आहे.

एकजण पोलिसांच्या ताब्यात यशवंत बागुल आणि हत्या करणाऱ्यांचा परिचय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना नावाने हाक मारून थांबविण्यात आले होते. बोलण्यात गुंतवून त्यांचा काटा काढल्याचे अगोदरच ठरलेले असावे. शिवाय यशवंत बागुल यांच्या हालचालीवर मारेकऱ्यांचे बारीक लक्ष असण्याची शक्यता आहे. त्याचमुळे रात्री बारीत त्यांना गाठण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे