धुळे : विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सकाळी ८ वाजेपासून सुरु झाली आहे़ सकाळी दहा वाजेपर्यंत धुळे १़०८ टक्के, साक्री २९़७३ टक्के , शिरपूर २८़५७ टक्के मतदान झाले होते़ शिंदखेड्यात मात्र शुन्य टक्के मतदान झाले होते़ मतदान केंद्रावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेण्यात आलेली आहे़ येणाऱ्या मतदारांना सॅनिटायझर लावले जात असून मास्क बंधनकारक करण्यात आलेले आहे़ या मतदान पथकांमध्ये मतदान केंद्रांध्यक्ष, मतदान अधिकारी एक, दोन, तीन, शिपाई आणि बंदोबस्तासाठी एका पोलिसाचा समावेश आहे. एकूण दहा पथके असून एक पथक राखीव ठेवण्यात आले आहे.
धुळे - नंदुरबार विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरळीतपणे सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 11:44 IST