शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Dhule: चोरट्यांची नजर, महिलांच्या दागिन्यांवर, धुळे जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये साडेसहा लाखांच्या मंगलपोत लंपास

By अतुल जोशी | Updated: May 10, 2023 15:23 IST

Dhule: तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील तब्बल ६ लाख २४ हजार ९८९ रूपये किंमतीच्या मंगलपोत लंपास केल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनला अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- अतुल जोशी

धुळे -  सध्या लग्नसराईमुळे बसगाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. तसेच यात्रेनिमित्त देवदर्शनाला येणाऱ्यांची गर्दी वाढलेली आहे. मात्र या गर्दीचा फायदा चोरटे घेत आहेत. जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील तब्बल ६ लाख २४ हजार ९८९ रूपये किंमतीच्या मंगलपोत लंपास केल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनला अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कावेरी वाल्मीकराव देशमुख (वय ६३, रा. हडपसर,पुणे) या ६ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोंडाईचा येथून शहाद्याकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेत, चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सुमारे १ लाख ५५ हजार रूपये किमंतीची मकोडा सोनपोत लंपास केली. याप्रकरणी त्यांनी ९ मे रोजी दुपारी दोंडाईचा पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हेड कॅान्स्टेबल हेमंत पाटील करीत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत प्रिंयंका जयंत भामरे (वय २६, रा, निजामपूर) या म्हसाई माता मंदिरात आलेल्या होत्या. याठिकाणी असलेल्या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेत प्रियंका भामरे यांच्या गळ्यातील १ लाख ८२ हजार ९३९ रूपये किंमतीचे ३२.७६० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, तसेच ६६ हजार ५८ रूपये किंमतीची  मंगलपोत मधील ११.८३० ग्रॅम वजन असलेले सोन्याचे पॅन्डल असा एकूण २ लाख ४८ हजार ९८९ रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी प्रियंका भामरे यांनी ९ मे रोजी निजामपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक आय.जी.शिरसाठ करीत आहेत.

बसमधून सोने असलेले  बॅग लंपासतर तिसऱ्या घटनेत शिरपूरकडून साक्रीकडे जाणाऱ्या बस (क्र. एमएच २०-बीए १४२४) मधून प्रवास करणाऱ्या लताबाई सुरेश मोरे (वय ५३, रा. सेंधवा, जि. बडवानी) यांची  बॅग लंपास केली. बॅगेतील  एकूण २ लाख २१ हजाराचा ऐवज  अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ९ मे रोजी दुपारी २ ते ३.४५ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शिरपूर पोलिसात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे