शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Dhule: रेंजर सायकल चोरणारा अट्टल चोरटा गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, मुद्देमाल जप्त

By देवेंद्र पाठक | Updated: November 6, 2023 18:46 IST

Dhule: देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने रेंजर सायकल चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास गजाआड करण्यात यश मिळविले.

- देवेंद्र पाठक धुळे - जिल्ह्याभरात मोटारसायकल चोरट्यांनी हैदोस घातलेला आहे. मात्र खास करून रेंजर सायकल चोरीला जाण्याच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने रेंजर सायकल चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास गजाआड करण्यात यश मिळविले. वसीम अजीज शेख (वय २०) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. एकवीरा देवी मंदिर परिसरात सायकल चोरटा आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली.  माहिती मिळताच सापळा लावून एकाला पकडण्यात आले. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.

त्याची प्राथमिक चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला. त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सायकली चोरल्याची कबुली दिली. वसीम अजीज शेख (वय २०, रा. पांचाळ वाडा, नदीकिनारी, देवपूर, धुळे) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. वसीम याने लपविलेल्या सायकली पोलिसांना काढून दिल्या. एलसीबीने ४२ हजार रुपये किमतीच्या ७ रेंजर सायकली जप्त केल्या आहेत. याशिवाय देचपूर पोलिसात दाखल गुन्ह्यची उकल करण्यात आली आहे. वसीम शेख हा अट्टल चोरटा असून त्याच्यावर देवपूर आणि पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्याम निकम, कर्मचारी अशोक पाटील, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, पंकज खैरमोडे, जितेंद्र वाघ, हर्षल चौधरी, योगेश साळवे, महेंद्र सपकाळ, कैलास महाजन यांनी कारवाई केली.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी