शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धुळे पोलिसांनी राबविले कोम्बिंग आॅपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 13:21 IST

शहरात तीन ठिकाणी कारवाई : ६ तलवारींसह तीन जणांना घेतले ताब्यात

ठळक मुद्देनाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी आपल्या अखत्यारीत असलेल्या पाचही जिल्ह्यांमध्ये कोम्बिंग आॅपरेशन राबवून शस्त्र शोध मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या नुसार धुळे पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत शहरात शस्त्र शोध मोहीम राबविण्यास सुरुवात केली. त्या अंतर्गत गावठी कट्टा, तलवारींसह धारदार शस्त्रे बाळगणाºयांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी पहाटे अचानक ही मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे गुंडांची चांगलीच  दाणादाण उडाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात वाढणारी गुंडगिरी लक्षात घेता यावर पायबंद घालण्यासाठी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळ्यातील संवेदनशिल भागात गुरुवारी पहाटे कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले़ अचानक राबविलेल्या या मोहिमेत ६ तलवारी मिळाल्या असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले़ आमदार अनिल गोटे यांनी जुगार अड्ड्यावर केलेली कारवाई, पोलिसांचे होणारे दुर्लक्ष आणि शहरात वाढणारी गुंडगिरी लक्षात घेता धुळे पोलीस आता सतर्क झाले आहेत़ नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनीही शस्त्र शोध मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते़ या अनुषंगाने गुरुवारी पहाटे आझादनगर, चाळीसगाव रोड आणि देवपूर पोलीस स्टेशन भागात कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले़ कोम्बिंग आॅपरेशन दरम्यान, रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार, धुळे शहरातून हद्दपार करण्यात आलेले गुंड, गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेणे यासह अवैध शस्त्र बाळगणाºया इसमांच्या घरी जाऊन पोलिसांच्या पथकाने शोध घेतला होता़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, आझादनगर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, देवपूर पोलीस निरीक्षक दत्ता पवार आणि चाळीसगाव पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी ही संयुक्तपणे मोहीम राबविली़  आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीत वाखारकर नगरातील नाटेश्वर कॉलनीत शुक्रवारी पहाटे दीड वाजता गणेश विक्रम सोनवणे (२३) हा लोखंडी तलवार घेऊन फिरताना आढळला़ त्याच्याकडील तलवार जप्त करण्यात आली आहे़ त्याच्याविरोधात आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला़ घटनेचा तपास साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निजाम सैयद करीत आहेत़ चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीत हाफिज सिद्दीकी नगरात सरदार हॉलजवळ तौसिफ शेख अजिज शेख (२५) हा लोखंडी तलवार घेऊन संशयितरीत्या फिरताना आढळून आला़ त्याच्याजवळील तलवार जप्त करण्यात आली असून त्याला अटक केली आहे़ हेड कॉन्स्टेबल एस़ एऩ महाजन करीत आहेत़ तसेच देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मरीमाता भिलाटीत आकाश जालीम गायकवाड (२६) हा तरुण लोखंडी तलवार घेऊन फिरताना आढळून आला़ त्याच्याकडील तलवार जप्त करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली़ पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी अवैध धंदे, शस्त्र शोधणे याकामी सतर्क झाले आहेत. नियमित आढावा घेतला जात आहे.

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस