शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Dhule: चहाच्या टपरीजवळ उभ्या तरुणाकडून पिस्तूल, काडतूस हस्तगत, पारोळा चौफुलीजवळील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: February 19, 2024 14:07 IST

Dhule News: पारोळा चौफुलीवर दुचाकीसह उभ्या असणाऱ्या तरुणाकडून दुचाकीसह दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस असा १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी सायंकाळी पावणे सहा वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

- देवेंद्र पाठक धुळे -  पारोळा चौफुलीवर दुचाकीसह उभ्या असणाऱ्या तरुणाकडून दुचाकीसह दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस असा १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी सायंकाळी पावणे सहा वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. शंकर बाकिसन रेड्डी (वय २२) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

पारोळा चौफुली परिसरात असलेल्या हनुमान मंदिराजवळील एका चहाच्या टपरीजवळ एक तरुण दुचाकीसह उभा आहे. त्याच्याकडे पिस्तूल असून, ती विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. ही माहिती मिळताच तरुणाला पकडण्यासाठी पथक रवाना करण्यात आले. हनुमान मंदिराजवळ थांबलेल्या तरुणाकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीची एक याप्रमाणे ८० हजार रुपये किंमतीची दोन पिस्तूल, २ हजार रुपयांची २ जिवंत काडतूस आणि (एमएच १८, सीबी ४४२९) क्रमांकाची ५० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शंकर बाकिसन रेड्डी (वय २२, रा. राष्ट्रवादी भवनजवळ, विद्युतनगर, मिल परिसर, धुळे) या तरुणाला अटक करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस हेडकाॅन्स्टेबल एस. एस. सोनवणे करत आहेत.त्याने ही पिस्तूल आणली कुठून व कोणाला विकणार होता, यासह अनुषंगिक माहिती पोलिसांकडून संकलित केली जात आहे.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी