शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिकेच्या स्थायीच्या  सभेत तीन मिनिटांत चार कोटींच्या कामांना मंजूरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 16:14 IST

केवळ विषय वाचनाची ‘फॉरमॅलिटी’, एकाही सदस्याने कोणत्याच विषयावर मत मांडले नाही

ठळक मुद्देअवघ्या तीन मिनीटात सभा संपलीविषय पत्रिकेवर सहा विषय घेतले होतेशहरात विविध जागांवर २३ उद्यांनांना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरूवारी सकाळी ११ वाजता आयोजित केली होती़ ११ वाजून १ मिनिटांनी सुरू झालेली सभा अवघ्या तीन मिनिटात अर्थात ११़४ वाजता संपल्याचा अजब प्रकार मनपात घडला़ विशेष म्हणजे केवळ विषय वाचनाची ‘फॉरमॅलिटी’ पार पाडून तीन मिनिटात चार कोटींच्या कामांना मंजूरी देण्यात आली़ प्रथमच अचूक वेळेवर सुरू झालेल्या या सभेला सभापती कैलास चौधरी, उपायुक्त रविंद्र जाधव, प्ऱनगरसचिव मनोज वाघ उपस्थित होते़ सभेच्या विषयपत्रिकेवर ६ विषय घेण्यात आले होते़ सभापतींसह नऊ सदस्यांच्या उपस्थितीत सभेला सुरूवात झाल्यानंतर प्ऱनगरसचिव मनोज वाघ यांनी विषयाचे वाचन सुरू केले़ विषय वाचन होताच सभापती कैलास चौधरी मंजूर म्हणून विषय मंजूर करीत होते़ अशाप्रकारे सर्व विषयांचे वाचन झाले व सर्व विषय अवघ्या तीन मिनिटांत मंजूर झाले़ एकाही सदस्याने सभेत कोणत्याच विषयावर मत मांडले नाही़ इतक्या कमी वेळेत सभा संपल्याने सदस्यांसह अनेकांची फसगत झाली़या विषयांना मिळाली मंजूरीस्थायी समितीच्या विषयपत्रिकेत असलेल्या विषयांमध्ये मागील तीन सभांचे इतिवृत्त कायम करणे, आयुक्तांच्या मान्यतेने आरोग्य विभागाने  निर्गमित केलेले कार्यादेश अवलोकनार्थ सादर करण्यासह प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे या योजनेच्या सर्वेक्षणासाठी कन्सल्टंट नेमण्याचा महत्त्वपूर्ण विषय होता़ त्यासाठी मागविण्यात आलेल्या दरनिविदा मंजूर करण्यास चर्चेविना मंजूरी मिळाली़ त्याचप्रमाणे देवपूर जलकुंभाजवळील व्हॉल्वच्या कामास कार्याेत्तर मंजूरी देण्यात आली़ चार कोटींचा विषय मंजूरअमृत अभियानांतर्गत शहरातील २३ जागांवर उद्यान निर्मिती करण्याचा विषयही डोळे झाकून मंजूर झाला़ अमृत योजनेंतर्गत पहिल्या व दुसºया टप्प्यात ४ कोटी २ लाख रूपयांच्या निधीतून २३ जागांवर उद्याननिर्मिती करण्याचा विषय मंजूर करण्यात आला़  शहरातील २३ जागांवर उद्यानांची निर्मिती केली जाणार असून त्यासाठी दरमंजूरी करण्यात आली़ त्यामुळे लवकरच कार्यादेश दिले जाणार असून उद्यानाच्या कामांना प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे़ स्थायी समिती सभापती आजारी असल्याने सभा लवकर आटोपण्यात आल्याचे काही सदस्यांनी सांगितले़