शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महानगर पालिकेसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ३२ टक्के मतदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 16:35 IST

सकाळची मरगळ झटकून बहुतांश केंद्रांवर लागल्या रांगा  

ठळक मुद्देदुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे ३२ टक्के मतदान बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगामुस्लिमबहुत परिसरातील केंद्रांवर सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी 

लोकमत आॅनलाईन धुळे : येथील महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी सुमारे ३२ टक्के मतदान झाले होते. सकाळी शुकशुकाट जाणवणाºया बहुतांश केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढत असल्याचे दिसून आले. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये सकाळीच मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले आहे. मात्र या वेळी धनलक्ष्मीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. जोपर्यंत पैसे मिळत नाही, तोपर्यंत मतदार घराबाहेर पडण्यास नाखूश दिसत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांना मतदानासाठी घराबाहेर काढताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसले.   मतदान केंद्रांच्या पसिरात पोहचल्यानंतरही मतदार मतदान करण्यास ते अनुत्सूक दिसत आहेत. याच्या उलट चित्र देवपूर परिसरातील महाजन हायस्कूल, एल.एम. सरदार उर्दू हायस्कूल, मोहाडी उपनगर आदी केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. त्यातही महिलांचा संख्या लक्षणीय असल्याचे दिसले. संवेदनशील केंद्रांवर दुपारनंतर मोठ्या रांगा लागतील, असा कयास बांधून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दुपारनंतर बहुतांश केंद्रांवर रांगा लागल्याने उशीरापर्यंत मतदान सुरू राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कार्यकर्त्यांना नाखूश मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रांत आणण्यात यश मिळाल्याने केंद्रांच्या आवारात रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून त्यानंतरही मतदान सुरूच राहील, असा अंदाज आहे. मुस्लिमबहुत भागातील केंद्रांवर सकाळपासून रांगा लागल्याचे चित्र दुपारनंतरही कायम होते. 

 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक