शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महानगरपालिकेने  केली एका महिन्यात तब्बल पाच हजार तक्रारींची सोडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 12:18 IST

 ‘स्वच्छता अ‍ॅप’चा प्रतिसाद वाढविण्यासाठी प्रयत्न

ठळक मुद्देमनपाने २४ तासाच्या आत केली समस्यांची सोडवणूकनागरिकांनी मनपाच्या कामावर व्यक्त केले समाधानतक्रारी सोडविल्याने, मनपाचा देशात ७०वा क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेत वारंवार चकरा मारून, निवेदन देऊनही समस्या सुटत नसल्याच्या तक्रारींची संख्या शहरात कमी नाही़ मात्र असे असतांनाच मनपा प्रशासनाने ‘स्वच्छता अ‍ॅप’च्या माध्यमातून एकाच महिन्यात तब्बल ५ हजार तक्रारींची सोडवणूक केली आहे़ मनपा यंत्रणेच्या या कार्यतत्परतेमुळे वरिष्ठ अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत़महापालिकेला स्वच्छ महाराष्ट्र २०१८ अंतर्गत केंद्र सरकारच्या स्वच्छता अ‍ॅपची जनजागृती करावयाची असून त्या अ‍ॅपच्या माध्यमातून प्राप्त होणाºया तक्रारींची २४ तासांत सोडवणूक करावयाची आहे़ अ‍ॅपच्या माध्यमातून होणाºया तक्रारींच्या सोडवणूकीनुसार मनपाला देशातील अन्य शहरांच्या तुलनेत रॅकींग मिळत आहे़ दरम्यान, मनपाने ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या महिनाभराच्या कालावधीत तब्बल ५ हजार ५२० तक्रारींची सोडवणूक २४ तासांच्या आत केली आहे़ सदर तक्रारी स्वच्छतेसंदर्भातील आहेत़ शिवाय या अ‍ॅपच्या माध्यमातून केलेल्या तक्रारी सोडविण्यात आल्यानंतर तक्रारकर्त्यांना मनपाच्या कामाबाबत प्रतिक्रिया देता येत       आहे़ त्यानुसार अ‍ॅपच्या माध्यमातून १ हजार ८७ नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या असून त्यापैकी १ हजार ४८ नागरिकांनी मनपाच्या कामावर समाधान व्यक्त केले असून २९ नागरिकांनी असमाधान व्यक्त केले आहे़ तर १० नागरिकांनी तटस्थ भुमिका घेतली आहे़ आतापर्यंत ४ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे़ तर ३१ डिसेंबरपर्यंत ७ हजार नागरिक अ‍ॅप डाऊनलोड करतील असे लक्ष्य मनपाने ठेवले असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत़ एकाच महिन्यात अ‍ॅपच्या वापरकर्त्यांसह तक्रारींच्या संख्येत भली मोठी वाढ झाली असल्याने व मनपाने तितक्याच तत्परतेने या तक्रारी सोडविल्याने मनपाचा देशात ७० वा क्रमांक सध्या आहे़