शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Dhule: अहो आश्चर्यम, रेल्वेची तिकीटे संपली, शेकडो प्रवाशांनी केला मोफत प्रवास, भोरस स्थानकावरील प्रकार

By सचिन देव | Updated: February 27, 2024 16:20 IST

Indian Railway News: प्रवाशांनी तिकीट काढुनच प्रवास करावा, अन्यथा टीटीईकडून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार सांगण्यात येते. मात्र, मंगळवारी चाळीसगावहुन धुळ्याकडे जाणाऱ्या मेमू गाडीचा भोरस स्टेशनवरील तिकीटांचा कोटांच संपल्याचा प्रकार घडला.

- सचिन देव धुळे -  प्रवाशांनी तिकीट काढुनच प्रवास करावा, अन्यथा टीटीईकडून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार सांगण्यात येते. मात्र, मंगळवारी चाळीसगावहुन धुळ्याकडे जाणाऱ्या मेमू गाडीचा भोरस स्टेशनवरील तिकीटांचा कोटांच संपल्याचा प्रकार घडला. यामुळे २०० हुन अधिक प्रवाशांनी गार्डच्या संमतीनेच भोरस ते बोरविहीर पर्यंत मोफत प्रवास केला. काही प्रवाशांनी टीटीई पकडेल, या भीतीने तिकीट देण्याची मागणी केली. मात्र, तिकीटचं शिल्लक नाही तर कुठून देणार, असे म्हणत हतबलता दाखवून या गार्डने प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली.

भुसावळ रेल्वे विभागातील चाळीसगाव ते धुळे दरम्यान दिवसातुन चारवेळा मेमू गाडी धावते. चाळीसगाहुन बसणाऱ्या प्रवाशांना या गाडीचे तिकीट चाळीसगाव स्टेशनवरच मिळते. मात्र, या गाडीच्या मार्गावर थांबा असलेल्या `भोरस बुद्रूक ` या रेल्वे स्टेशनवर तिकीट खिडकी नसल्यामुळे, या गाडीच्या गार्डमार्फत प्रवाशांना तिकीटे दिली जातात. मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे ही गाडी चाळीसगाव स्टेशनहुन निघून, भोरस बुद्रूक स्टेशनवर आल्यानंतर प्रवाशांनी तिकीटे काढण्यासाठी गार्डकडे एकच गर्दी केली होती. विशेष म्हणजे कधी नव्हे ३०० ते ४०० प्रवाशांनी या गाडीच्या मागील बाजूस असलेल्या गार्डच्या डब्याजवळ तिकीटे घेण्यासाठी रांग लावली होती. मात्र, यातील केवळ ५० ते ६० प्रवाशांना तिकीटे मिळाली. तर उर्वरित प्रवाशांना गार्डने तिकीट संपल्याचे सांगितले. यामुळे प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. यावेळी प्रवाशांनी मगआम्ही प्रवास करायचा, टीटीईने पकडले तर आम्ही काय करायचे, अशा प्रश्नांचा भडिमार करून, गार्डला तिकीटे देण्याची मागणी केली. मात्र, गार्डने तिकीटचं देण्यासाठी नाही, तर कुठून देणार, असे म्हणत प्रवाशांना तिकीट नसले तरी प्रवास करण्याचे सांगितले.साहेब टीसीने पकडले तर दंड तुम्ही भरा..भोरस स्टेशनवर तिकीटे संपल्यानंतर रांगेत उभ्या असलेल्या २०० ते २५० प्रवाशांनी एकच गोंधळ केला. या वेळी काही प्रवाशांनी साहेब, गाडीत टीसीने पकडल्यावर आम्ही काय करू, दंड तुम्ही भरणार का, आम्ही टिसीला तुमचेच नाव सांगू, असे म्हणत गार्डला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तर काही प्रवाशांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.टीसीने विनातिकीट कारवाई करू नये, म्हणून मी तिकीट काढण्यासाठी गार्डच्या डब्याजवळ गेलो. मात्र, त्यांनी तिकीट संपल्याचे सांगितल्यावर मला आश्चर्य वाटले. मग त्यांनींच प्रवास करू शकता, असे सांगितल्यावर मी बोरविहीरला जात आहे.- देवा शिंदे, प्रवासी 

या मेमू गाडीला प्रत्येक स्टेशनवरून सरासरी बसणाऱ्या प्रवाशांच्या संख्येनुसार तिकीटे दिलेली असतात. मात्र, मंगळवारी जास्त प्रवासी आल्यामुळे ही तिकीटे संपली. त्यामुळे गार्ड ऐनवेळी कुठून तिकीटे आणणार. यापुढे जादा तिकीटे देण्याबाबत चाळीसगाव स्टेशन प्रशासनाला कळविले जाईल.संतोष जाधव, स्टेशन प्रबंधक, धुळे रेल्वे स्टेशन.

तर रेल्वेचेही नुकसान..या मेमू गाडीचे भोरस ते बोरविहीर १५ रूपये तिकीट आहे. मात्र, २०० हुन अधिक प्रवाशांना तिकीटचं मिळाले नसल्यामुळे, रेल्वेचे तिकीटांपासून मिळणारे आर्थिक उत्पन्नही बुडून आर्थिक नुकसान झाले. जर याच प्रवाशांवर टीटीईने दंडात्मक कारवाई केली असती, तर यातुन रेल्वेचा मोठा महसुल मिळाला असता. मात्र, गाडीत सुदैवानी टीटीई नसल्यामुळे या प्रवाशांवर कारवाई झाली नाही.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेDhuleधुळे