शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Dhule: बसस्टँडमध्ये शिरल्या अन् ६३ हजारांची पोत गमावून बसल्या, साक्री बसस्थानकातील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: January 9, 2024 17:55 IST

Dhule News: गर्दीचा फायदा घेत चोरट्याने हात सफाई करून वृद्ध महिलेच्या गळ्यातील ६३ हजारांची सोनपोत लांबविली. ही घटना साक्री बसस्थानक परिसरात सोमवारी दुपारी घडली. घटना लक्षात येताच वृद्ध महिलेने आरडाओरड केली पण, त्याचा काही उपयोग झाला नाही.

- देवेंद्र पाठक धुळे - गर्दीचा फायदा घेत चोरट्याने हात सफाई करून वृद्ध महिलेच्या गळ्यातील ६३ हजारांची सोनपोत लांबविली. ही घटना साक्री बसस्थानक परिसरात सोमवारी दुपारी घडली. घटना लक्षात येताच वृद्ध महिलेने आरडाओरड केली पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. रात्री सव्वाआठ वाजता चोरीचा गुन्हा दाखल झाला. धुळे शहरातील जुने धुळे भागातील सुपडू आप्पा कॉलनीत राहणारी कमलाबाई आत्माराम माळी (वय ६५) या महिलेने साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. काही कामानिमित्त कमलाबाई माळी या साक्रीत आलेल्या होत्या, आपले काम आटोपून त्या मार्गस्थ झाल्या. सोमवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास त्या साक्री बसस्थानकात दाखल झाल्या पण, धुळ्याकडे जाण्यासाठी त्या वेळेस एकही बस ही स्थानकात उभी नव्हती, त्यामुळे त्या बसस्थानकातील शेडमध्ये थांबलेल्या होत्या. त्यावेळेस प्रवाशांची बऱ्यापैकी गर्दी होती.

गर्दीचा गैरफायदा चोरट्याने उचलला आणि कमलबाई यांच्या गळ्यातील ६३ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरट्याने शिताफीने लांबविली. चोरीची ही घटना साेमवारी दुपारी पावणेचार ते सव्वाचार वाजेच्या सुमारास घडली. थोड्या वेळानंतर कमलाबाई यांना गळ्यात सोन्याची चैन दिसून आली नाही. तिने सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. याप्रकरणी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास साक्री पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला. घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल के. एस. शिंदे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे