शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेत धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुका अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:42 IST

योग्य अंमलबजावणी : तालुक्यातील सहा हजार लाभार्थ्यांना घरकुले

ठळक मुद्देजिल्ह्यातील १७ हजार २०७  लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्णजिल्ह्यात शिंदखेडा तालुका मागेउद्दिष्टात केली वाढ

लोकमत आॅनलाईन धुळे : पंतप्रधान घरकुल योजनेतून सर्वसामान्य व्यक्तीचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी लाभार्थ्यांना घरकुल योजनेतून अर्थसहाय्य केले जाते़ या योजनेतून  जिल्ह्यातील १७ हजार २०७  लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाली आहे़ दरम्यान या योजनेतून शिरपूर तालुक्यातील  ६ हजार ४७ लाभार्थ्यांनी लाभ मिळाला आहे़ त्यामुळे घरकुल योजनेत गेल्या दोन वर्षात शिरपूर तालुका अव्वल ठरला आहे़ अल्पउत्पन्न असणाºया आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना  प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काच्या घरा स्वप्न पूर्ण केले होत आहे़ आर्थिकदृष्या मागासलेल्या नागरिकांचे राहणीमानात बदल होऊन त्यांना हक्कांचे घर मिळण्यासाठी केंद्र व राज्यसरकार घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्य करीत आहे़  घरकूल लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून एक लाख, कर्ज आधारित व्याज अनुदान देण्यात येते तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पउत्पन्न घटकांसाठी परवडणाºया घरांची निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून अनुदान तर राज्य शासन एक लाखांचे अनुदान देणार आहे़आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास केंद्र शासन दीड लाख तर राज्य शासनाकडून एक लाखापर्यंत अनुदान दिले जात़े त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरांचे स्वप्न या योजनेतून पुर्ण होत आहेग़्रामीण भागासह शहरातील झोपडपट्टयांचे पुनर्विकास होण्यासाठी घरकुल कर्ज, संलग्न व्याज, अनुदान देण्यात येत आहे़ त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाºया घरांचीनिर्मिती केली जात आहे़ पंतप्रधान घरकुल आवास योजनेसाठी सन २०१६-१७ मध्ये ८५ टक्के उदिष्ठे प्रशासनाला देण्यात आले होते़ त्यात धुळे तालुक्यासाठी  १२११, साक्री १९६०,शिरपूर २००१, तर शिंदखेडा तालुक्यासाठी ९७९ उदिष्टे होते़ दरम्यान २०१६-१७ मध्ये चारही तालुक्यातून ६०१५१ घरकुल बांधण्यात आले़ २०१९ पर्यत सर्वांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाला घरकुलाचे उष्ठिटे वाढवून देण्यात आले आहे़   दरम्यान, घरकुल योजनेत धुळे, साक्री, शिंदखेडा तालुक्याच्या तुलनेत शिरपूर तालुका अव्वल असून तर शिंदखेडा तालुका मागे आहे़ 

आवास योजनेतून हक्काचे घरकुल़़़सन २०१७-१८ मध्ये धुळे तालुक्याला  १८८४, साक्री ३६५४,  शिरपूर ४०४६, शिंदखेडा १४७० अशा ११ हजार ५४ घराचीनिर्मिती करण्यात आली़ घरकुल योजनेतून दोन वर्षात धुळे तालुक्यात ३०९५, साक्री ५६१४, शिंदखेडा २४४९ शिरपूर तालुक्यात ६०४७ लाभार्थी आहेत़ तर सुमारे दोनवर्षात १७ हजार २०५ लाभार्थ्यांना पंतप्रधान घरकुल योजनेतून हक्काचे घर मिळाले आहे़

 

टॅग्स :DhuleधुळेHomeघर