शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा कारागृहातील बंदीवानांना ‘आधार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:54 IST

अभिनव उपक्रम : पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या आधारकार्ड मोहीमेचे स्वागत

ठळक मुद्देजिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव जे़ ए़ शेख यांची मोठी मदत याकामी कारागृह अधीक्षक वैभव आगे यांना मिळाली़कारागृहात वेळोवेळी आरोग्य शिबिर, वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान होत असते़ त्यातून बंदिवानांमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरु असतो़ 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील कारागृहातील बंदिवानांचे आधारकार्ड काढण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली़ त्यामुळे बंदिवानांना सुध्दा स्वत:ची एक नवी ओळख मिळाली असल्याचे समाधान त्यांच्या चेहºयावर होते़ कारागृहात येण्याची कोणालाही इच्छा नसते़ पण, या ना त्या कारणाने कारागृहात येण्याचा कटू प्रसंग संबंधितांवर ओढवतो़ एखाद्या प्रकरणात न्यायालयाकडून शिक्षा मिळाल्यानंतर त्याचे स्वरुप लक्षात घेतल्यानंतर कारागृहात बंदिवान येतो़ तो आल्यानंतर त्याची संपूर्ण चौकशी केली जाते़ या ठिकाणी येणाºयांमध्ये गरीबांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे़ काहींकडे तर स्वत:ची ओळख असलेले आधारकार्ड देखील नसते़ न्यायालयाकडून ज्यांना शिक्षा देण्यात आली आहे आणि त्यातील ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही अशांसाठी आधारकार्ड मोहीम राबविण्याचे आदेश न्यायालयाकडून पारीत झाले़ त्याची अंमलबजावणी धुळे कारागृहात करण्यात आली़ कारागृहात येणाºयांमध्ये सर्वच शिक्षित असतातच असे नाही़ त्यामुळे बंदिवान पुरुष आणि स्त्रीया यांना लिहीता आणि वाचता यावे यासाठी देखील कटाक्षाने लक्ष दिले जात आहे़ कारागृहात आता प्रौढ साक्षरता वर्ग सुरु करण्यात आला आहे़ लवकरच नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु आहे़ कारागृहात येणाºया बंदिवानांचे आधार कार्ड काढण्यात आले आहे़ त्यात २६ पुरुष, २ महिलांचा समावेश आहे़ त्यांच्याकडे आधारकार्ड नसल्याने विशेष मोहीम यासाठी राबविण्यात आली, असे धुळे जिल्हा कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी सांगितले़ 

टॅग्स :Dhuleधुळेjailतुरुंग