शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 11:36 IST

संवर्ग १ व २ मधील शिक्षकांसाठी पोर्टल सुरू,११ एप्रिलपर्यंत माहिती भरावी लागणार

ठळक मुद्देबदली प्रक्रियेसाठी पोर्टल सुरू ११ एप्रिलपर्यंत माहिती भरावी लागणारशिक्षकांमध्ये समाधान

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या वर्षापासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला अखेर  सुरवात झाली.विशेष संवर्ग १ व संवर्ग २ मधील शिक्षकांसाठी आॅनलाईन विनंती बदली अर्ज भरण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यासाठी ११ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात आली.शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकतेबरोबरच गतिमानता यावी  या उद्देशाने शासनाने  गेल्यावर्षी  संगणकीय बदली प्रक्रिया धोरण स्वीकारले. त्यात संवर्ग १,२,३,४ तयार करून, त्या पद्धतीने बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र या प्रकियेत बराच गोंधळ असल्याने, गेल्यावर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याच होऊ शकल्या नाहीत.२०१८-१९ या वर्षासाठी बदली प्रक्रियेला सुरवात झाल्याने,  अनेकवर्षे दुर्गम भागातील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.   विशेष संवर्ग १ मधील अपंग, सेवाज्येष्ठ, विधवा, गंभीर आाजारी शिक्षकांची तसेच संवर्ग २ मधील पती-पत्नी  असलेल्या शिक्षकांसाठी  आॅनलाइन विनंती बदली अर्ज भरण्यासाठी पोर्टल ६ एप्रिलपासून सुरू केले आहे. या दोन्ही संवर्गातील शिक्षकांनी ११ एप्रिलपर्यंत आपली माहिती भरायची असल्याचे सांगण्यात आले. गेल्यावर्षी संवर्ग एक व २ मध्ये पात्र नसणाºया शिक्षकांनीही आॅनलाईन अर्ज भरले होते. अशांवर काहींनी आक्षेपही घेतले होते. यंदा शिक्षण विभागाने ही बाब गांभीर्याने घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी बदली प्रक्रियेत काही निवडक बदल करण्यात आले आहेत.जिल्ह्यात २३ अवघड क्षेत्रातील शाळाजिल्ह्यात अवघड क्षेत्रातील शाळांची  संख्या २३ आहे. त्यात धुळे तालुक्यात ६, शिरपूर तालुक्यात १४, शिंदखेडा तालुक्यातील ३ शाळांचा समावेश आहे. साक्री तालुक्यात एकही अवघड क्षेत्रातील शाळा नाही.अद्याप बदलीपात्र यादी नाहीराज्यस्तरावरून बदली प्रक्रियेस सुरवात झाली असली तरी जिल्हा परिषद स्तरावरून मात्र अद्याप कसल्याही हालचाली नाहीत. संवर्ग १ मधील शिक्षकांना शाळा निवडता येतील अशा बदलीपात्र शिक्षकांच्या याद्याच अजून जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रसिद्ध झालेल्या नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या लवकर प्रसिद्ध करण्याची मागणी होऊ लागली आहे. 

 

टॅग्स :Dhuleधुळेeducationशैक्षणिक