आॅनलाइन लोकमतधुळे : शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वेळेत शिक्षण विभागाने बदल करीत अर्धातास वाढविला आहे. तर आगामी वर्षात उन्हाळ्याच्या कालावधीत दुपारी सव्वा वाजेपर्यंत विद्यार्थी, शिक्षकांना शाळेत थांबावे लागणार आहे. शाळेच्यावेळेत केलेल्या बदलाचे पत्र प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी नुकतेच जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाºयांना पाठविले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गावागावात जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार १०३ शाळा असून, त्यात पहिली ते चौथीचे जवळपास ८८ हजार १४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.दरम्यान दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीपासूनच शाळा सुरू होण्याची वेळ सकाळी ११ ते ५ यावेळेत असायची. मात्र २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या वेळेत थोडे बदल करण्यात आले आहे. यावर्षी शैक्षणिक सत्र १७ जून २०१९ पासून सुरू होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवसांपासून म्हणजे १७ ते ३० जून २०१९ या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात भरेल. शाळेची वेळ सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी १ वाजून दहा मिनीटांपर्यंत असेल. म्हणजे तब्बल सहा तास दहा मिनीटे शाळेचे कामकाज चालणार आहे.तर १ जुलै १९ ते २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत शाळा सकाळी १०.३० ते ४.५० या कालावधीत भरविण्यात येणार आहे. पूर्वी दर शनिवारी शाळेची वेळ सकाळी ७ ते १०.३० अशी होती. मात्र यावर्षापासून त्यात अर्धातास वाढ करण्यात आला असून, आता दर शनिवारी सकाळी ७ ते ११ ही शाळेची वेळ असणार आहे.तसेच रमजान महिन्यात उर्दू शाळा व दर श्रावण सोमवारी सकाळी ७ ते दुपारी १२.३० या कालावधीत भरविण्यात येतील.पूर्वी ही वेळ सकाळी ७ ते ११.३० अशी होती. म्हणजे यातही एक तासाने वाढ केलेली आहे. शाळेच्या वेळेत केलेल्या बदलाची माहिती जिल्ह्यातील चारही पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तसेच महापालिका शिक्षण मंडळाला कळविण्यात आले आहे. हे आदेश प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत.दरम्यान या निर्णयाचे काही शिक्षकांनी स्वागत केले आहे, तर काहींनी हा निर्णय चुकीचा असल्याचे नमूद केले आहे.
धुळे जिल्हा परिषद शाळेची वेळ अर्ध्या तासाने वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 11:19 IST
३० जूनपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरणार, गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले पत्र
धुळे जिल्हा परिषद शाळेची वेळ अर्ध्या तासाने वाढविली
ठळक मुद्देधुळ्यात जि.प.च्या ११०३ शाळानवीन शैक्षणिक वर्षात शाळेच्या वेळेत बदलशिक्षक संघटनांनी व्यक्त केली नाराजी