शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात मद्यपी तरुणांचा पोलिसांवर हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 22:14 IST

पोलीस निरीक्षकासह तीन जखमी : शिंदखेड्यातील भगवा चौकातील घटना, चार अटकेत 

ठळक मुद्देपोलीस निरीक्षकासह तीन जखमी शिंदखेडा येथील भगवा चौकातील घटनाचौघांविरूद्ध गुन्हा, सर्वांना केली अटक 

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : शहरातील भगवा चौकात मद्यप्राशन करून हातात दांडके घेऊन धिंगाणा घाणाºया चार तरुणांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच त्यांनी हल्ला चढविला. हल्यात पोलीस निरीक्षक सतीश गोराडे आणि दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी चारही तरुणांना अटक केली आहे.शिंदखेडा शहरातील भगवा चौकात रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास  आकीब इस्माईल पठाण (वय २७) स्टेट बँकेच्या मागे, गोपाल रमेश परदेशी (२०) माळी वाडा, आकाश नानाभाऊ सोनवणे (३१)स्टेशनरोड भिलाटी, आणि सलमान मुश्ताक खाटी (३५) रा. अशोक टॉकीजजवळ सर्व रा. शिंदखेडा हे चौघी तरुण  मद्यप्राशन करुन हातात दांडके घेऊन गाड्या अडवून शिवीगाळ करीत दहशत माजवित परिसरात धिंगाणा घालत होते. यासंदर्भात माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, पोलीस कॉन्स्टेबल नथ्थु माळी आणि अविनाश सुदाम लोखंडे हे  त्यांना पकडण्यासाठी भगवा चौकात पोहचले. त्याचवेळी चिमठाणा दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण हे सुद्धा आपल्या पथकासह त्याठिकाणी आले. यांनी त्या तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी यांच्यावरच हल्ला चढविला. हल्यात पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या उजव्या हाताची दोन बोटे फॅक्चर  झाली. पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश नथ्थू माळी यांचा हात फॅक्चर झाला आहे. तर पोलीस कॉन्स्टेबल अविनाश सुदाम लोखंडे यांच्या कपाळाला मार लागला आहे.  शेवटी चारही तरुणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल सुशीलकुमार रामचंद्र गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील चारही आरोपीविरोधात भांदवि कलम ३३३, ३३२, ३२५, ३५३, १८६, ३४१, ११०, ११२/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा