शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

धुळे जिल्ह्यात दहावी, बारावीसाठी ५५ हजार विद्यार्थी प्रविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 11:14 IST

बारावीसाठी ४४ तर दहावीसाठी ६३ केंद्र

ठळक मुद्देबारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीत होणारदहावीची परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०१९ या कालावधित होणारपाच भरारी पथकांची नियुक्ती

आॅनलाइन लोकमतधुळे : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये घेण्यातयेणाऱ्या बारावी व दहावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने तयारी केली आहे. इयत्ता बारावीसाठी २५ हजार ३५७ तर इयत्ता दहावीसाठी २९ हजार ७१५ विद्यार्थी असे दोन्ही परीक्षा मिळून ५५ हजार ७२ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले आहेत. गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी १ हजार २९१ विद्यार्थी कमी आहेत.इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीत होणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०१९ या कालावधित होणार आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.बारावीसाठी ४४ केंद्रजिल्ह्यात ४४ केंद्रावर बारावीची परीक्षा होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये ७, धुळे ग्रामीणमध्ये १४, साक्री तालुक्यात ९, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी ७-७ अशा एकूण ४४ केंद्रावर परीक्षा होणार आहे.दहावीसाठी ६३ केंद्रदहावीची परीक्षा जिल्ह्यातील ६३ केंद्रांवर होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये १३, धुळे ग्रामीणमध्ये १७, साक्री तालुक्यात १३, शिरपूर तालुक्यात ९, व शिंदखेडा तालुक्यात ११ अशा एकूण ६३ केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.५५ हजार ७२ विद्यार्थी परीक्षा देणारबारावीची परीक्षा २५ हजार ३५७ तर दहावीची परीक्षा २९ हजार ७१५ असे एकूण ५५ हजार ७२ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत.दरम्यान गेल्यावर्षी बारावीसाठी २५ हजार ८८५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. तर दहावीसाठी ३० हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या दोन्ही परीक्षा मिळून यावर्षी १ हजार २९१ विद्यार्थी कमी झालेले आहेत.पाच भरारी पथकांची नियुक्तीपरीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून मंडळातर्फे पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहेत. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, डायटच्या प्राचार्या तसेच डायटच्या वरिष्ठ अधिव्याख्यात्या यांचा समावेश आहे.आठ ठिकाणी कस्टडीप्रश्नपत्रिका पुरवठा करण्यासाठी व उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण आठ कस्टडीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये धुळे शहर व ग्रामीणसाठी ३ कस्टडी, साक्री तालुक्यासाठी दोन कस्टडी, शिरपूर तालुक्यासाठी एक कस्टडी, शिंदखेडा तालुक्यासाठी २ कस्टडींची व्यवस्था करण्यात आलेली आहे.दरम्यान कॉपीमुक्त परीक्षा पार पडण्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे