शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहरात साडेपाच लाख रुपयांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 11:37 IST

दागिने व रोख रकमेचा समावेश, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमतधुळे : शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी साक्रीरोडवरील कुमारनगरात एका व्यावसायिकाकडे घरफोडी करून सोन्यांचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ५८ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना २ आॅक्टोंबर रोजी पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे चोरी झाली त्या घरातील सर्व सदस्य घरात होते. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे तीन ते चार चोरटे एका कारमधून साक्रीरोड परिसरात आले. सर्वप्रथम त्यांनी साक्रीरोडवरील जोशी गोंधळी कॉलनीत एक दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकान फोडत असतांना शटरचा आवाज आल्याने, काही नागरिक जागे झाले. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. पुढे कुमारनगरात असलेले मनोज रोहडा यांच्या किराणा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी काजू बदामाच्या तीन बरण्या लंपास केल्या. तसेच जवळपास १५ ते २० हजाराची रक्कम या ठिकाणाहून लंपास केली.यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा कुमारनगरातील बेकरी व्यावसायिक ठाकवणी यांच्या ‘शामजी कृष्णा’ या बंगल्याकडे वळविला. या बंगल्याच्या लोखंडीगेटला कूलूप लावलेले होते. चोरट्यांनी कटरच्या साह्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ४ लाख ८३ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख ७५ हजार रूपये असा एकूण ५ लाख ५८ हजार रूपयांचा माल लंपास केला.सर्व सदस्य घरातचदरम्यान चोरीची घटना घडत असतांना ठाकवाणी यांच्या घरातील सर्व सदस्य घरातच गाठ झोपेत होते. सकाळी ७ वाजेनंतर घरच्यांच्या लक्षात घरी धाडसी चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक आर.एम. उपासे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक उगले यांनी भेट देवून पहाणी केली.याप्रकरणी जगदीश हरीराम ठाकवाणी (वय ४१, रा. ब्लॉक नं. क्यू ४, कुमारनगर, धुळे) यांच्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे