देवेंद्र पाठक। लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहर हद्दवाढीनंतर विविध प्रशासनांच्या पातळीवर बदल होत आहेत. असे असताना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातूनही याकडे गांभीर्याने पाहण्यात येत आहे. त्यामुळे आता शहर पोलीस स्टेशनचेही विभाजन करण्यात येणार आहे़ त्यानुसार स्वतंत्र पोलीस ठाणे आणि अजून एक उपविभागीय पोलीस अधिकारी नियुक्त करण्याच्या हालचालीस वेग आला असून त्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनीही दुजोरा दिला. विभाजनाचा निर्णयधुळे शहर हद्दवाढीत दहा गावांचा समावेश झाला आहे़ मात्र ही गावे सद्यस्थितीत वेगवेगळया पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात येतात़ हे कार्यक्षेत्र तसेच कायम राहणार असले तरी शहराची संवेदनशिलता लक्षात घेता शहर पोलीस ठाण्यावर लोकसंख्येचा व संवेदनशिल भागांचा भार देखील वाढणार आहे़ त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलीस ठाण्याच्या विभाजनाचा निर्णय झाला आहे़ दरम्यान, त्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाला सादर करण्यात आला आहे़ गृह विभाग घेणार निर्णयशहर हद्दवाढीनंतर धुळे शहर पोलीस ठाण्याच्या विभाजनाचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांना सादर केला आहे़ तेथून हा प्रस्ताव शासनाच्या गृह विभागाकडे जाईल़ त्यानंतर या प्रस्तावाच्या मान्यतेबाबतचा निर्णय गृह विभाग घेणार आहे़ संवेदनशिल ठिकाणांवर ‘वॉच’धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सद्यस्थितीत ४ संवेदनशील ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत़ त्यात अकबर चौक, मोगलाई, भिमनगर आणि रेल्वे स्टेशनचा काही भाग यांचा समावेश आहे़ याशिवाय जी गावे शहर हद्दीत जोडली जाणार आहेत, त्यातीलही काही भाग संवेदनशील असल्याने त्या भागांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी शहर पोलीस ठाण्याचे विभाजन केले जाणार आहे़ ४ लाख लोकसंख्येचा भारधुळे शहर पोलीस ठाण्यावर सध्या तब्बल ४ लाख १४ हजार ४६५ इतक्या लोकसंख्येचा भार आहे़ त्यातच शहर हद्दवाढीतील ग्रामीण भागाचा समावेश झाल्यास लोकसंख्या व कार्यक्षेत्रात आणखी वाढ होईल़ त्यामुळे हा भार काही प्रमाणात विभागणे आवश्यक असल्याने शहर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन पोलीस ठाणे निर्माण केले जाणार आहे़ शहर पोलीस ठाण्यात सध्या पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी दिलीप गांगुर्डे यांच्याकडे आहे़ त्यांच्या दिमतीला एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक देण्यात आले आहेत़ शहर पोलीस ठाण्यात अजून ४० ते ५० कर्मचाºयांची आवश्यकता आहे़ परंतु विभाजनाच्या निर्णयामुळे मनुष्यबळाची कमतरता दूर केली जाणे आवश्यक आहे़
धुळे शहर पोलीस ठाण्याचे होणार विभाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 12:38 IST
शहर हद्दवाढीमुळे कार्यक्षेत्राचा विस्तार : कायदा सुव्यवस्थेसाठी आणखी एक उपअधीक्षक येणार
धुळे शहर पोलीस ठाण्याचे होणार विभाजन
ठळक मुद्देशहर हद्दवाढीची अधिसूचना ५ जानेवारीला जाहीर झाली आहे़ या अधिसूचनेनुसार हद्दवाढीत वलवाडी, भोकर, महिंदळे, नकाणे, अवधान, चितोड, वरखेडी, बाळापूर, मोराणे, पिंपरी व नगाव गावाचा अंशत: भाग याप्रमाणे समावेश झाला आहे़ शहर हद्दवाढीत गावे समाविष्ट झाली असलीतरी संबंधित गावे ज्या पोलीस ठाण्याशी जोडले गेले आहेत, तशीच ती राहणार आहे़ मात्र सर्वाधिक भार धुळे शहर पोलीस ठाण्यावर राहणार आहे़ परिणामी सोईच्या दृष्टीने या पोलीस ठाण्याचे विभाजन होणार आहे़शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या १० गावांसह एकूण १७ गावांचे पोलीस पाटील पद रद्द करण्याचे आदेश प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी गेल्या आठवड्यात दिले होते. याशिवाय आऊट पोस्टमधील पोलीस पाटील ही सर्व रिक्त पदे देखील रद्द करण्यात आली आहेत़ उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्याकडे सध्या धुळे विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ त्याअंतर्गत शहरातील विविध पोलीस ठाण्यांचा कारभार आहे़ अशा स्थितीत शहर पोलीस ठाण्याचे विभाजन झाल्यानंतर आणखी एक उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी मिळणार आहे.