शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

धुळे शहर पोलीस निरीक्षकांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 17:33 IST

मुलीकडून ‘आपबिती’ व्यक्त :  धुळे शहर पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : परधर्मीय युवकाच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी आणि त्यांच्या पथकाला यश आले आहे़ मुलीची सुटका करत त्यांनी तिच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या स्वाधीन केले़ एका निरागस मुलीचे आयुष्य वाचले आहे़ दरम्यान सोमवारी रात्री हा सर्व प्रकार समोर आला़ जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी धुळ्यातील मोहाडी उपनगरात राहणाºया आपल्या मोठ्या बहिणीकडे आली होती़ बहिणीच्या घराचे रंगकाम सुरु असल्याने तेथे काम करणाºया एका परधर्मीय मुलाशी तीची ओळख झाली़ हा मुलगा साक्री रोडवरील शनीनगरात वास्तव्याला होता़ या दोघांमध्ये सूत जुळल्याने मुलीने आपले सर्वस्व पणाला लावले़ गेल्या आठवड्यात या मुलाने तिला मंगरुळ येथून पळवून आणले़ मात्र, धुळ्यात आल्यावर तिला घराच्या तळघरात डांबून ठेवण्यात आले़ यादरम्यान तिचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याने ती हादरुन गेली होती़ तिकडे मुलीचे आई-वडील चिंतेत पडले होते़ त्यांना आपली मुलगी धुळ्यात असल्याचे समजल्यावर त्यांनी धुळ्यात येऊन त्या मुलाचा पत्ता शोधून काढला़ त्याठिकाणी गेल्यावर पालकांना मुलीचे दर्शन झाले नाही़ उलट त्या मुलासह त्याच्या वडिलांनी तुमची मुलगी आमच्याकडे नाही, असे सांगत शिवीगाळ करून धमकावत हाकलून लावले़ या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीस ठाणे गाठत अपहरणाची तक्रार नोंदविली़ त्यानुसार भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल झाला़ अमळनेर पोलिसांनी कारवाई सुरु करण्याआधीच एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून ही बाब शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांना कळाली़ त्यांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून अमळनेर पोलीस येतील आणि तपास करतील, या आशेवर न राहता स्वत:च तपासाची चक्रे फिरविली़ शोध पथकातील कर्मचाºयांच्या माध्यमातून त्या मुलाचे घर शोधून काढले़ तेथे गेल्यावर पोलिसांनाही उडवाउडवीची उत्तरे मिळाली़ मात्र पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी पोलिसी खाक्या दाखविताच पीडित मुलीसह हा नेमका काय प्रकार आहे हे समोर आले़ शहर पोलिसांनी त्या मुलीचा ताबा घेत तिला पोलीस ठाण्यात आणले़ तिच्या आई-वडिलांसह अमळनेर पोलिसांना माहिती कळविण्यात आली़ मोहाडी येथील तिची बहिण-मेहूणेही पोलीस ठाण्यात दाखल झाले़ नातलगांना पाहिल्यानंतर या मुलीने आपबिती कथन केली़ हे ऐकून सर्वांचा संताप झाला. मात्र ही मुलगी केवळ १५ वर्षाची असल्यामुळे प्रकरण संयमाने घेण्यात आले़ अमळनेर पोलीस त्यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास करुन कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले़ संयमाची भूमिका कौतुकास्पदधुळे शहर हे संवेदनशील आहे़ गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ वाढली असली तरी आता शांतता आहे़ अशातच या प्रकारामुळे पुन्हा एकदा वातावरण बिघडण्याचा धोका असल्याने पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी हे प्रकरण संयमाने हाताळले आहे़ पीडित मुलीची सुटका करुन तिला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे़ पोलिसांच्या या कारवाईने ‘माणुसकी’चे दर्शन घडले आहे़  

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस