शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहर पोलिसांनी एकास कारसह केली अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 16:33 IST

१० लाखांची लूट प्रकरण : मुंबई पोलीस दलाचा कर्मचारी असल्याची माहिती 

ठळक मुद्देकुरियर कंपनीच्या कर्मचा-याकडून लुटले होते १० लाख रूपयेधुळे मध्यवर्ती बसस्थानकातील गेल्या बुधवारची घटना कारसह एकास अटक, मुंबई पोलीस कर्मचारी असल्याची माहिती 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील मध्यवर्ती बसस्थानकात कुरियर कंपनीच्या कर्मचाºयाकडून १० लाख रुपये लुटल्याप्रकरणी शहर पोलिसांनी एकास कारसह अटक केली असून तो मुंबई पोलीस दलाचा कर्मचारी असल्याची खात्रीलायक माहिती आहे. मात्र त्याचे नाव सांगण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शवली. कर्मचाºयांना लुटीची ही घटना गेल्या बुधवारी घडली होती. या प्रकरणी शनिवारी रात्री अज्ञात लुटारूंविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासार्थ पोलिसांनी तपास चक्रे फिरवून एकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी क्र.एमएम ०२ एयू ९४८० या क्रमांकाची कारही त्याच्याकडून ताब्यात घेतली आहे. या कर्मचाºयाचे नाव कळू शकलेले नाही. मात्र तो मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाºयांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून पकडलेल्या आरोपीकडून काय माहिती मिळते याकडे आता लक्ष लागले आहे.अशी घडली होती लुटीची घटना अहमदाबाद येथील रामभाई मोहनदास अंगडिया या कुरियर कंपनीच्या जळगाव येथील शाखेत कार्यरत अमरतभाई हिराभाई पटेल  प्रकाशभाई दायाबाई पटेल हे बुधवारी पहाटे जळगाव येथून सुरतला जाण्यासाठी निघाले. जळगावच्या शाखेत जमा केलेले १० लाख रूपये व्यवस्थापक संजयभाई प्रजापती यांनी अमरतभाई याच्याकडे दिले.जळगाव-नंदुरबार बसने ते दोघे येथील मध्यवर्ती बसस्थानकात उतरले. याचवेळी खाकी रंगाचा शर्ट, पॅँट घातलेले दोघे जण तेथे आले. तसेच त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून अमरतभाई  यास ताब्यात घेतले. यावेळी प्रकाशभाई याने पळ काढला. त्या नंतर बसस्थानकाबाहेर उभ्या कारमध्ये डांबून तिसगाव ढंढाणे गावाकडे नेले. अमरतभाई यास हवाल्याच्या पैशांचा व्यवहार करतो असे सांगून शिवीगाळ, दमदाटी करत १० लाखाची लूट केली होती. 

 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा