शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Dhule: बेटावदच्या व्यावसायिकाला १२ लाखांचा गंडा, गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

By देवेंद्र पाठक | Updated: April 13, 2023 18:18 IST

Crime News: टरबूज खरेदी करून गुजरात राज्यातील दोघा व्यापाऱ्यांनी शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील व्यावसायिकाला १२ लाख २५ हजार रुपयांत गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे.

- देवेंद्र पाठकधुळे : टरबूज खरेदी करून गुजरात राज्यातील दोघा व्यापाऱ्यांनी शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील व्यावसायिकाला १२ लाख २५ हजार रुपयांत गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात नरडाणा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रहिम खान रशिद खान पठाण (वय ४८, रा. बेटावद ता. शिंदखेडा) यांनी नरडाणा पोलिसात फिर्याद दाखल केली.

त्यानुसार, गुजरात राज्यातील गोध्रा येथील दोन व्यापाऱ्यांनी रहिम खान यांच्याशी संपर्क साधला. ‘हमको आपसे फ्रूट लेना हे. आप अच्छा माल बेचते हो, आपको मिलना हे, आकर पुरी तरह व्यापार की बात करेंगे,’ असे सांगितले. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये दोघे बेटावद येथे रहिम खान यांच्याकडे आले. त्यांनी टरबूज पाहिजे, असे सांगत महिनाभरात पाठविलेल्या मालाचे पैसे देऊ, असे सांगितले. यावर विश्वास ठेवून रहिम खान यांनी वेळोवेळी तब्बल १२ लाख २५ हजार ११४ रुपयांचा माल गुजरातला रवाना केला; परंतु माल पोहोचूनही दोघा व्यापाऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर वर्षभराच्या अवधीनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रहिम खान यांनी नरडाणा पोलिस ठाणे गाठत दोघा व्यापाऱ्यांविरोधात बुधवारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे