शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धुळे जिल्ह्यात बंद नाही, ठिय्या आंदोलन मात्र चौथ्या दिवशीही सुरूच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 13:50 IST

एस.टी. बसेस बाहेरून वळवल्या, औरंगाबाद सेवा चाळीसगावपर्यंत

ठळक मुद्देशहरातून येणा-या बसेस मार्ग बाहेरून वळविलाऔरंगाबाद बससेवा पोलिसांच्या सूचनेनुसार चाळीसगावपर्यंत मर्यादित मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच 

लोकमत आॅनलाईनधुळे  : आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी महाराष्टÑ बंदची हाक दिली आहे. मात्र जिल्ह्यात बंद नसून सर्व व्यवहार सुरळीत सुरू असून शहरातून येणाºया एस.टी. बसेसचा मार्ग बदलून त्या बाहेरून वळविण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यक ती खबरदारी बाळगण्याच्या सूचनाही वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचे एस.टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मराठा समाजाला आरक्षणासह अन्य विविध मागण्यांसाठी २१ जुलैपासून मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यात जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलनासह रास्तारोको करण्यात येत आहे. आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी सोमवारी औरंगाबाद येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी ‘महाराष्टÑ बंद’ची हाक दिली. मात्र पंढरीच्या वारक-यांना परतीच्या प्रवासात कोणतीही दुखापत होऊ नये, तसेच त्यांची वाहने, एस.टी. बसेस यांना लक्ष्य करू नये, असे आवाहन मोर्चाच्या समन्वयकांनी केले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे स्थानिक पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी एकवटले आहेत. आज चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच असून त्यास समाजासह अन्य समाज घटकांचाही वाढता पाठिंबा मिळत आहे. मंगळवारी सकाळी राज्य परीट सेवा मंडळानेही आपला पाठिंबा जाहीर केला. धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात येणा-या बसेसचा मार्ग बाहेरून वळविण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वी शहरातून येणा-या बसेस राष्टÑीय महामार्गावरील वळण रस्त्यांनी बसस्थानकात येत असून त्याच मार्गे बाहेर पडत आहेत. जिल्ह्यातील सर्व बसफे-या नियमित व सुरळीत सुरू असल्याची माहिती एस.टी.च्या विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी दिली. केवळ  धुळे-औरंगाबाद थेट बस सेवा पोलिसांच्या सूचनेनुसार चाळीसगावपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. वरिष्ठ पातळीवरून खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या असून काही अनुचित प्रकार घडल्यास बसेस आगारात जमा करण्यासही सांगण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. 

 

टॅग्स :DhuleधुळेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा