शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळे : शेतीकामासाठी मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले

By अतुल जोशी | Updated: September 7, 2022 17:40 IST

तालुक्यातील बोराडी ते वाडी गावादरम्यान असलेल्या नांदर्डे गावाजवळ घाट उतरत असताना हा अपघात झाला.

शिरपूर (जि.धुळे) : शेतीकामासाठी मजुरांना घेऊन जाणारे वाहन रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या अपघातात चार मजूर किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. तालुक्यातील बोराडी ते वाडी गावादरम्यान असलेल्या नांदर्डे गावाजवळ घाट उतरत असताना हा अपघात झाला. गाडीमधील मजुरांनी तात्काळ १०८ क्रमांकाला संपर्क साधून मोठा अपघात झाल्याचे सांगून रूग्णवाहिकेची मागणी केली. त्यामुळे काही वेळातच तब्बल ४ रूग्णवाहिका दाखल झाल्या. जखमींना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

बुडकी गावाकडून मजूर घेऊन जाणारी चारचाकी (एमएच २१-सी-३०८९) ही शिरपूरकडे येण्यासाठी निघाली होती. बोराडी घाट उतरून गाडी भरधाव वेगाने येत असतांना चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या झाडाझुडपात जाऊन उलटली. त्यात अपघात गाडीतील सर्व मजूर इतरत्र फेकले गेले.

अपघातातील जखमींना नगरपालिकेच्या इंदिरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी ३ जणांना उपचार करून सोडण्यात आले तर एका युवतीची तब्बेत गंभीर असल्यामुळे तिला तातडीने धुळे येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात आहे. या अपघातप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा सायंकाळी उशिरापर्यंत दाखल झालेला नव्हता.

टॅग्स :AccidentअपघातDhuleधुळे