धुळे : जिल्ह्यातील १७१ रूग्णांचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे शहरातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ऐंशी फुटी रोड परिसरातील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.शनिवारच्या अहवालांनुसार, धुळे शहरातील ८८रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शिंदखेडा तालुक्यातील ३९, धुळे तालुक्यातील २७, शिरपूर तालुक्यातील तीन, व साक्री तालुक्यातील १४ रूग्णांना बाधा झाली आहे़ जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ४२२० इतकी झाली आहे.
धुळे : शनिवारी १७१ अहवाल पॉझिटिव्ह, दोन रूग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 22:00 IST