शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

धुळ्यात धूमस्टाईल येत तरुणाच्या हातातून मोबाईल हिसकाविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 16:52 IST

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील गोगापूर येथील द्रव्या रविंद्र पाटील हा तरुण शिक्षणासाठी शिरपूर नगरीत वास्तव्यास आहे.

राजेंद्र शर्मा

धुळे : धूमस्टाईल दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने तरुणाच्या हातातून मोबाईल हिसकावून पोबारा केला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बालाजी नगर भागात घडली. आरडा ओरड होत नाही तोपर्यंत दोघे अनोळखी पळून जाण्यात यशस्वी ठरले. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात रात्री जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील गोगापूर येथील द्रव्या रविंद्र पाटील हा तरुण शिक्षणासाठी शिरपूर नगरीत वास्तव्यास आहे. शिरपूर येथील बालाजी नगराच्या बोर्डाजवळून तो माेबाईलवर बोलत जात होता. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याच्या पाठीमागून दोन अनोळखी तरुण दुचाकीवरुन भरधाव वेगाने आले. त्यापैकी एकाने तरुणाच्या हातातून जबरदस्तीने ८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. दोघांनी दुचाकीवरुन पळ काढला. तरुणाने आरडा ओरड केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात रात्री ११ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार, भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल लादूराम चौधरी घटनेचा तपास करीत आहे.

 

टॅग्स :Dhuleधुळे