शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धर्मा पाटील यांच्या निधनानंतर संतप्त ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 12:39 IST

दोंडाईचा-विखरण मार्ग रोखला

ठळक मुद्देशासनाच्या विरोधात घोषणाबजी  विखरण गावात शोककळा

ऑनलाईन लोकमत

शिंदखेडा, धुळे, दि. 29 -   शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या निधनानंतर सोमवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी दोंडाईचा-विखरण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करीत पाटील कुटुंबीयांना न्याय मिळावा; या मागणीसाठी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच शासनाच्या विरोधात तीव्र संतापही व्यक्त केला. विखरण येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा मंगा पाटील (80) यांच्या जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्याने त्यांनी गेल्या सोमवारी थेट मंत्रालयात विष प्राशन केले. तेव्हापासून त्यांच्या प्रकृती ही चिंताजनक होती. त्यांच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी रात्री 10 वाजून 45 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच विखरण ग्रामस्थांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. त्यांच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील हे होते. मात्र, त्यांनी योग्य न्याय मिळत नाही. तोर्पयत त्यांचे पार्थिव उचलणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यातच त्यांच्या विखरण गावातही धर्मा पाटील यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत सोमवारी सकाळी आंदोलन के ले. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

-  काबाडकष्ट करून शेती करणारे धर्मा पाटील यांच्या पश्चात प}ी सकूबाई पाटील, मुलगा नरेंद्र व महेंद्र पाटील, सून सुनीता व मनीषा पाटील, तसेच मुली रंजना विजयराव सोनवणे (हातेड), रेखा सतीश निकम (देवगाव) व प्रतिभा प्रदीप पवार (गंगापुरी, ता. अमळनेर) असा परिवार आहे. - प्रस्तावित सौर प्रकल्पासाठी त्यांच्या जमिनीला केवळ 4 लाख 3 हजार रुपयांचा मोबदला मिळाला होता. परंतु, त्यांच्या शेत जमिनीला लागून असलेल्या शेतमालकास 1 कोटी 89 लाख रुपये मिळाले होते. त्यामुळे त्यांच्यावर झालेला अन्यायाविरोधात त्यांचा प्रशासन व शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू होता. - धर्मा पाटील यांच्या निधनामुळे विखरण गावात शोककळा पसरली आहे.