लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील १०० फुटी रस्ता परिसरात असलेल्या मुल्ला कॉलनीत चोरट्यांनी सेवानिवृत्त वनपालाच्या घरी घरफोडी करून, सोन्याचे दागिने , रोख दीड लाख रूपये असा एकूण २ लाख १८ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज १७ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी आज चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील मुल्ला कॉलनी परिसरात प्लॉट नं.५४ मध्ये सेवानिवृत्त वनपाल जमालोद्दिन गमिरूद्दिन शेख यांचे घर आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी घराच्या वॉल कंपाऊंडच्या गेटवरून कुदुन आत प्रवेश करीत घराचे कुलूप तोडले. चोरट्यांनी घरातील कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. तसेच कपाटातील दीड लाख रूपये रोख, ६८ हजाराचे विविध दागिने असा एकूण २ लाख १८ हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना १७ रोजी सकाळी ११ ते रात्री १२ वाजेच्या दरम्यान घडली.याप्रकरणी जावीद शेख (३७) यांनी चाळीसगावरोड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पीएसआय पांढारकर करीत आहेत.
धुळ्यात धाडसी घरफोडी, रोख रक्कमसह सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:36 IST
अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल
धुळ्यात धाडसी घरफोडी, रोख रक्कमसह सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास
ठळक मुद्देसेवानिवृत्त वनपालच्या घरी चोरीकुलूप तोडून चोरांनी केला आत प्रवेशकपाटातील साहित्य फेकून दिले