धुळे - कंटेनरमधून गुरांची तस्करी होत असून राजस्थानमधून गुरे येत असल्याची गोपनीय माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना मिळताच कुंडाणे फाट्यावर पोलिसांनी सापळा लावला आणि गुरे, कंटेनरमिळून २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.राजस्थानमधून महाराष्ट्रात येणारा एचआर ५५ पी ६३०४ क्रमांकाचा कंटेनर मुंबई आग्रा राष्ट्रीय महामागार्ने धुळ्याच्या दिशेने येत असताना कुंडाणे फाट्याजवळ सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास कंटेनर येताच तो थांबविण्यात आला. चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळताच कंटेनर रस्त्याच्या बाजूला करुन चालकाला पोलीसी खाक्या दाखविण्यात आला. त्याच्या चौकशीतून ही सुमारे ४० गुरे राजस्थानमधील भिलवाडा येथून मालेगावच्या दिशेने नेल्या जात असल्याचे उघड झाले आहे.कंटेनरमधील गुरे कोंबलेल्या अवस्थेत आढळून आली. यातील ३ ते ४ गुरांचा गुदमरुन मृत्यू झाला असल्याचे पोलिसांना तपासणीतून आढळून आले. पोलिसांनी कंटेनरमधील जीवंत असलेली गुरे कंटेनरमधून खाली उतरुन पांझरा पोळ येथील गो-शाळेत पाठविले. पोलिसांनी १५ लाख रुपये किंमतीच्या कंटेनरसह ४ ते ५ लाखांची गुरे असा मिळून सुमारे २० लाखांचा गुरे जप्त केली आहेत.
देवपूर पोलिसांची सतर्कता गुरांची तस्करी केली उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 22:43 IST