शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कामानिमित्त बाहेर गेलेल्या युवकांचा गाव विकासाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:17 IST

संडे अँकर । व्हॉटस्अ‍ॅपद्वारा केली विकास मंचची स्थापन; सुरुवातीलाच जमविला ७५ हजाराचा विकास निधी

जैताणे : गावाचे आपल्यावर उपकार आसतात आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने गावातील नोकरी, व्यवसाय निमित्ताने इतर शहरात वास्तव्यास असलेल्या आमखेल येथील तरुणांनी एकत्र जमून व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी आमखेल विकास मंच स्थापना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून केली. तसेच गावातील कामांसाठी विकास निधी म्हणून तब्बल ७५ हजार रुपये जमवले.दिवाळीनिमित्ताने हे सर्व युवक गावात जमल्यानंतर त्यांनी विकास मंचतर्फे स्रेहमिलनाचा कार्यक्रम घेतला. अध्यक्षस्थानी काळू फुला मोरे तर सिमेवर कार्यरत जवान सचिन मोरे, विजय मोरे, राहूल मोरे, विवेक मोरे, रामा आहिरे, तसेच प्राथमिक शिक्षक गोकुळ पाटील यांच्यासह सर्वच ग्रुपचे सर्वच सदस्य उपस्थित होते.यावेळी नाशिक येथे कार्यरत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप पवार यांनी गावातील पशुंसाठी मोफत सेवा पुरविण्याचे आश्वासन दिले. त्यांनी गावातील पशुधनाची आरोग्य तपासणी देखील केली. प्रा.डॉ.सचिन मोरे यांनी गावातील लोकांना आरोग्य, हागणदारीमुक्त गाव, तंटामुक्त गावाची संकल्पना सांगितली.आमखेल ग्रामपंचायतचे उपसरपंच ज्ञानेश्वर पवार यांनी जलसंधारणच्या माध्यमातून केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. नरेंद्र मोरे यांनी गावाची दशा व दिशा याविषयी मार्गदर्शन केले. गोबजी मोरे, नानासाहेब मोरे, मोहन सूर्यवंशी, प्रा.राजेंद्र मोरे, दत्तू मोरे, शालीक पवार, दिलीप ठाकरे, प्रा.दीपक बेडसे यांनी पर्यावरण, वृक्षारोपण संदर्भात मार्गदर्शन केले.व्यसनमुक्तीसाठी प्राथमिक शिक्षक गोकुळ पाटील यांनी तंबाखूमुक्त गावाची संकल्पना ,तंबाखूमुळे होणारे असाध्य आजार, यावर उपाय याबाबत सखोल मार्गदर्शन केले. पेठ येथील शाखा अभियंता जितेंद्र पाटील यांनी केलेल्या जलसंधारणाच्या विविध कामाची माहीती व उत्कृष्ट कार्य याबाबत पीपीटी व स्लाईडशो मधून माहिती दिली. तसेच स्मशानभूमी व गावात आठ फुट उंचीचे २५ वृक्ष लावण्यात आली. तसेच गावातील समस्यांवर चर्चा करून त्याचे निराकरण करण्यासाठी गावातील तरुण तसेच ज्येष्ठ ग्रामस्थांना सर्वोतपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन तरुणांनी दिले. सुत्रसंचलन शांतीलाल मोरे यांनी केले तर आभार बंडू मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील संदीप मोरे, अविनाश नांद्रे, पितांबर मोरे, सागर मोरे, दिनेश मोरे, रिंकू पाटील, महेश पवार, रवींद्र ठाकरे, संदीप गुलाब मोरे, विश्वास ठाकरे, हेमराज मोरे, विलास मोरे तसेच शिवराजे ग्रुप, कानल ग्रुप यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे