शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या संख्येवर बस फेऱ्या अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 22:26 IST

आंतरजिल्हा बससेवा सुरू : धुळे आगारातून नाशिक, औरंगाबाद, जळगाव, चोपडासाठी बससे सोडणार

धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल साडेचार महिन्यानंतर आंतरजिल्हा बससेवा २० आॅगस्ट पासून सुरू होणार आहे. मात्र ही सेवा टप्प्या-टप्याने सुरू होणार असून, प्रवाशांच्या प्रतिसादावरच बस फेऱ्यांची संख्या अवलंबून राहणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून संपूर्ण भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची बससेवा तेव्हापासून बंद होती. आगारातील कर्मचारीही घरीच होते. मध्यंतरी धुळे आगाराच्या बसेसने कोटा (राजस्थान) येथील विद्यार्थ्यांना राज्याच्या वेगवेगळ्या भागात पोहचविले होते. त्यानंतर परप्रांतीय मजुरांना सीमेपर्यंत पोहचविण्यासाठी एस.टी.ची मोफत सेवा सुरू करण्यात आली होती.दरम्यान लॉकडाउनच्या चौथ्या टप्यात शासन निर्देशानुसार रेड झोन व नॉन रेडझोन असे दोन टप्पे करण्यात आले होते. त्यानुसार नॉनरेड झोनमध्ये २२ मे २०२०पासून बससेवा सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला होता. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा, व साक्री हे आगार नॉन रेड झोनमध्ये असल्याने या आगारातून जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली होती. मात्र धुळे महापालिका क्षेत्र ‘रेड झोन’मध्ये असल्याने, धुळे मध्यवर्ती बसस्थानकातून बससेवा सुरू झालेली नव्हती. जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली तरी त्याला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. प्रवाशांअभावी बसेस या आगारात उभ्या होत्या. पुरेशा प्रमाणात प्रवाशी मिळत नसल्याने, काही आगारांनी या फेºयाही रद्द केल्या होत्या. दरम्यान एस.टी.चे आर्थिक उत्पन्नच थकल्याने, त्याचा परिणाम कर्मचाºयांच्या पगारावर झालेला होता. काही कर्मचाºयांनी तर उदरनिर्वाहासाठी दुसरा व्यवसाय सुरू केले होते. दरम्यान गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असतांना राज्य सरकारने आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेऊन गणेशभक्तांबरोबरच प्रवाशांनाही सुखद धक्का दिला आहे. शासन निर्देशानुसार ५० टक्के प्रवाशी वाहतुकीप्रमाणे एका बसमध्ये फक्त २२ प्रवाशी बसविण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. बस स्थानकातून निघण्यापूर्वी सॅनिटराईज करण्यात येणार आहे. आंतरजिल्हा बससेवा सुरू होणार असली तरी पूर्वीप्रमाणे एकदम बससेस सुरू करण्यात येणार नाहीत. टप्या-टप्प्याने बसेस सोडण्यात येणार आहेत. जोपर्यंत प्रवाशांची संख्या १५ होत नाही तोपर्यंत आगारातून बस सोडण्यात येणार नाही. गुरूवारी धुळे मध्यवर्ती बसस्थानकातून नाशिक, औरंगाबाद, जळगाव, व चोपडा या चार मार्गांवर बसेस सोडण्यात येतील. साधारणत: सकाळी ८.३० वाजेपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. जेवढ्या बसगाड्या सोडण्यात येतील तेवढेच चालक व वाहक यांना बोलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.बसेसची तपासणीदरम्यान धुळे आगारातील बसेस साडेचार महिन्यापासून जागेवरच उभ्या होत्या. गुरूवारपासून बससेवा सुरू होणार असल्याने, त्या सुरू होतात की नाही याची तांत्रिक विभागाकडून तपासणी करण्यात येत होती.आंतरजिल्हा बससेवा गुरूवारपासून सुरू होत आहे. टप्या-टप्याने बसेस सोडण्यात येतील. प्रवाशांची मागणीवर फेºया अवलंबून राहणार आहे. -पी. डी. देवरे, विभागीय वाहतूक नियंत्रक,धुळे

टॅग्स :Dhuleधुळे