शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीतर्फे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 15:31 IST

शासनविरोधी दिल्या घोषणा, जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

ठळक मुद्देशिक्षकांनी दुपारी २ ते ३ यावेळेत केले धरणे आंदोलनविविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिलेशिक्षकांनी दिल्या शासन विरोधी घोषणा

लोकमत आॅनलाइनधुळे : जुनी पेंशन योजना लागू करावी, बीएलओंसह सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामांतून शिक्षकांना मुक्त करावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीतर्फे आज दुपारी क्युमाईन क्लबसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असणाºया शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी अनेकदा निवेदन देवून प्रत्यक्ष भेटूनही प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात शासनस्तरावर कुठलीच हालचाल करण्यात आली नाही. शासनाचा संबंधित विभाग चर्चा करण्याबाबतही उदासिन आहे. शासनाचे शिक्षकांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी १ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ३ यावेळेत प्राथमिक शिक्षकांनी एकूण २४ मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. त्यात १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त शिक्षक कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना व भविष्य निर्वाह निधी योजना लागू करवी, प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्राप्त शिक्षकांना वंचीत ठेवू नये,३१ डिसेंबर २०१७पर्यंत एम.एस.सी.आय.टी. अर्हता धारण न केलेल्या शिक्षकांना डिसेंबर २०१८पर्यंत मुदतवाढ मिळावी. कपात केल्या वेतनवाढी मागील लाभासह परत मिळाव्यात, कमी पटाच्या नावाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेची कोणतीच शाळा बंद करू नये,  यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.यावेळी शासनविरोधी घोषणाही देण्यात आल्या.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस बापू पारधी, सुरेश पाटील, सुरेश सोनवणे,कैलास दाभाडे  आंनद पाटील, प्रभाकर रायते, सुभाष पगार, गोकुळ सोनार, जितेंद्र राजपूत, मधुकर पाटील, भूपेश वाघ यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. यानंतर शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. 

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण