लोकमत न्यूज नेटवर्कशिरुड : रब्बी हंगामातील विविध पिके भरण पोषणाच्या अंतिम टप्प्यात असून या पिकांना गिरणा धरणांतर्गत पांझण डाव्या कालव्याच्या पाटचारी क्रमांक ५, ६ व ७ मधून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिरुड व खोरदड शिवारातील शेतकºयांनी केली आहे.धुळे तालुक्यातील शिरुड व खोरदड शिवातील शेती सिंचनासाठी दरवर्षी गिरणा धरणांतर्गत पांझण डाव्या कालव्याद्वारे पाटचारी क्रमांक ५ ते ७ द्वारे जानेवारी ते मे महिनाअखेर अनेक आवर्तने सोडली जातात. तथापि, यावर्षी जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत पाण्याचे एकही आवर्तन अद्याप सोडण्यात आलेले नाही.सद्यस्थितीत शिरुड आणि खोरदडच्या शेतकºयांनी रब्बी हंगामात ज्वारी, बाजरी, गहु, हरभरा, भुईमूग मका अशा विविध पिकांची लागवड केली आहे. अद्यापपर्यंत शेतकºयांनी विहिरीच्या पाण्यावर पिके जगवली. मात्र, आता विहिरी आटत आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे रब्बी पिके सुकून पिवळी पडू लागली आहेत. पिके भरण पोषणाच्या अंतिम टप्प्यात आहे. या स्थितीत पुरेसे पाणी मिळाले नाही तर उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे.त्यामुळे पाटबंधारे विभागास पाणी आवर्तन सोडण्याबाबत कार्यवाही व्हावी. या पाटचाºयांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी शेताच्या बांधावरच पाणी आवर्तनाचे शासकीय शुल्क देण्यासाठी तयार असल्याचेही म्हटले आहे.
शिरुड, खोरदड शिवारात पाटचाऱ्यांना आवर्तन देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:06 IST