वडजाई येथील उपकेंद्रात सुरुवातीला शंभर व नंतर पन्नास अशा एकूण एकशे पन्नास लस आतापर्यंत उपलब्ध झाल्या आहेत. त्या लस उपलब्ध होऊन सव्वा महिन्याचा कालावधी उलटला. त्यानंतर मात्र एकही लस उपलब्ध झालेली नाही. एकशे पन्नास लोकांचा दुसरा डोस घेण्याची वेळ येऊन गेली असून, दररोज नागरिक उपकेंद्रात लस आली का विचारण्यासाठी फेऱ्या मारत आहेत. शिरुड येथील मुख्य केंद्रात आतापर्यंत साडेतीन हजार लोकांचे लसीकरण झाले आहे. उपकेद्रांचे आरोग्यसेवक संजय संघवी, सेविका देवरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी मागणी करूनही लस उपलब्ध होत नाही, तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वडजाई उपकेंद्राला लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सरपंच अलका देवरे, उपसरपंच संजय देव, कैलास बाविस्कर, संतोष देवरे, विजय सोनवणे, अनिल साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य गणेश देवरे, नाना शिंदे, दिलीप देवरे, आदींनी केली आहे.
वडजाई उपकेंद्रावर लस उपलब्ध करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST