शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

६२ हजार हेक्टरसाठी ४३ कोटींच्या अनुदानाची शासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:11 IST

शिंदखेडा तालुक्यात पंचनामे पूर्ण : ९६ हजार शेतकऱ्यांचे ८० हजार हेक्टरवरील पीक बाधित

शिंदखेडा : तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ९६ हजार शेतकऱ्यांचे ८० हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. ६२ हजार हेक्टरसाठी ४३ कोटी रुपये अनुदानाची शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे.शिंदखेडा तालुक्यात परतीच्या सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांनी पंचनामे पूर्ण केले असून त्यात ९६ हजार ४४९ शेतकºयांच्या ८० हजार १०३.०२ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात ८० हजार ८९ शेतकºयांनी ६२ हजार ८६९.२१ हेक्टरवरील पीक विमा काढलेला नसल्याने त्यासाठी शासनाकडे ४३ कोटी २२ लाख ५८ हजार ४७ रुपये अनुदानाची मागणी शिंदखेडा तहसील कार्यालयाकडून करण्यात आली आहे. तालुक्यात फक्त १६ हजार ३६० शेतकºयांनीच १७ हजार २३३.८१ हेक्टरवर पीक विमा काढलेला होता.शिंदखेडा तालुक्यातील १० मंडळात परतीच्या सततच्या पावसाने सर्वच पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. अजूनही शेतातील पिकात पाणी असून काही पिके सडून गेली आहेत. त्यात शासनाकडून ८ तारखेपर्यंत पंचनामे करण्यास सांगण्यात आले होते. ते सर्व पंचनामे मुदतीत पूर्ण करण्यात आले आहेत. त्यात ३३ टक्केच्या वर नुकसान झालेले ज्वारी २ हजार २५९.२१ हेक्टर, बाजरी ७ हजार ७६३.८८ हेक्टर, मका ५ हजार ४५३.१७ हेक्टर, भुईमूग १ हजार ५२४.७६ हेक्टर, सोयाबीन ३५.४० हेक्टर, कापूस ६१ हजार ५१७.३९ हेक्टर, भाजीपाला ७ हजार ७०.७४ हेक्टर, इतर पिके ७ हजार ७८.४७ असे एकूण ९६ हजार ४४९ शेतकºयांचे ८० हजार १०३.०२ हेक्टरवरील पिके सततच्या पावसाने बाधित झाली आहेत. पैकी त्यात १६ हजार ३६० शेतकºयानी १७ हजार २३३.८१ हेक्टरचा पीक विमा काढला आहे. उर्वरित ८० हजार ८९ शेतकºयांनी ६२ हजार ८६९.२१ हेक्टरवर पीक विमा काढलेला नसल्याने अशा शेतकºयांसाठी जिरायती पिके त्यात कापूस ४७ हजार ६५७.८३ हेक्टर, मका ४ हजार १८१.६५ हेक्टर, ज्वारी १ हजार ८८५.४२ हेक्टर, बाजरी ६ हजार ६९४.८१ हेक्टर, भुईमूग ९४० हेक्टर, सोयाबीन २२.१० हेक्टर, व इतर पिके ७ हजार ७८.४७ हेक्टर असे एकूण ६२ हजार १६०.६४ हेक्टरसाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपयेप्रमाणे ४२ कोटी २६ लाख ९२ हजार ३५२ रुपयांचे तसेच बागायती पिकात कांदा ७०८.५७ हेक्टरवरील हेक्टरी १३ हजार ५०० रुपये प्रमाणे ९५ लाख ६५ हजार ६९५ असे एकूण ४३ कोटी २२ लाख ५८ हजार ४७ रुपये ६२ हजार ८६९.२१ हेक्टर या क्षेत्रासाठी अनुदान मागणी शिंदखेडा तहसीलकडून शासनास करण्यात आली आहे.यात सदर अनुदान हे पीक विमाक्षेत्र वगळून करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे