लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाहीर सभेसाठी धुळयात आले असता त्यांनी राम पॅलेस येथे व्यापारी व नागरिकांशी संवाद साधला़ यावेळी व्यापाºयांनी एमआयडीसीसाठी अतिरीक्त जागा संपादन करण्याचा १६ महिन्यांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली़धुळे एमआयडीसीत अनेक नवीन उद्योजकांना जागा उपलब्ध नाही़ त्यामुळे अतिरीक्त जागा उपलब्ध झाल्यास उद्योगांना चालना मिळेल, अशी भुमिका धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी मांडली़ एमआयडीसीत पाडळदे धरणातून पाणी आणण्याची योजना देखील अनेक दिवसांपासून प्रलंबित असून ती मार्गी लावण्याची मागणीही यावेळी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली़ त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच उद्योग वाढीसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले़ यावेळी व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते़
एमआयडीसीत अतिरीक्त जागा संपादनाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:30 IST