शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी ६ लाख रोपांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 15:42 IST

मोहीम : ५४१ ग्रामपंचायतींमध्ये १०० टक्के खोदकाम पूर्ण; उद्या नाशिक येथे आढावा बैठक

ठळक मुद्देशासनाने यंदा ग्रामपंचायतींसोबत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासाठी ८ हजार ४०० रोपांची लागवड करण्याचे आदेश दिले होते.परंतु, जागेची अडचण विचारात घेता, जिल्हा मुख्यालयाला मिळालेले उद्दिष्ट हे चारही तालुक्यातील ग्रामपंचायतींनीच पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासकीय पातळीवरून देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्याला प्राप्त उद्दिष्टाची पूर्ती करून २१०० रोपांची लागवड करावी

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :    शासनाने सूचित केल्या प्रमाणे यंदाही जिल्ह्यात १ ते ३१ जुलै दरम्यान वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून यंदा वृक्ष लागवड करण्यासाठी ५ लाख ९८ हजार ६३१ रोपांची मागणी वन विभागाकडे करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे देण्यात आली  आहे. दरम्यान, वृक्ष लागवड मोहीमेसंबंधी गुरूवारी, ३१ रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

वृक्ष लागवड मोहीमेंतर्गत जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींना ५ लाख ९० हजार २३१ वृक्षांची तर जिल्हा परिषद मुख्यालयाला स्वतंत्र ८ हजार ४०० वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट असे एकूण ५ लाख ९८ हजार ६३१  वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहीमेसाठी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून ग्रामपंचायतस्तरावर खड्डे खोदण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींर्गत खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले असून त्याबाबत आॅनलाइन माहिती वन विभागाच्या संकेतस्थळावर भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वृक्ष लागवडीसाठी रोपे उपलब्धवृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात प्राप्त झालेले उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे वृक्ष लागवडीबाबतची मागणी वन विभागाकडे केली आहे. परंतु, जिल्ह्यासाठी प्राप्त उद्दिष्टांऐवढे रोपे शिल्लक असल्याची माहिती ग्रामपंचायत शाखेतर्फे देण्यात आली आहे. वन विभाग व सामाजिक वनीकरण या विभागांच्या सहकार्याने ही मोहीम राबविली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने रोपे ग्रामपंचायतींना उपलब्ध करून दिले जातील, असे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदDhuleधुळे